Join us

Agriculture Scheme: पारंपरिक शेतीबरोबर फळ लागवडीचा पर्याय; असे मिळते अनुदान वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:01 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (MNREGA) शेतकऱ्यांना रोजगार देणे, शेतीत उपयुक्त घटक वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीबरोबरच (Traditional Farming) प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (MNREGA) शेतकऱ्यांना रोजगार देणे, शेतीत उपयुक्त घटक वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीबरोबरच (Traditional Farming) प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.

वाशिम जिल्ह्यात 'मनरेगा'तून ७८५ हेक्टरवर फळबाग लागवड (Fruit Cultivation) केली आहे. फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना रोजगारासोबतच शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जाते. सदर योजना ही राज्यभरात राबविण्यात येत आहे.

आंबा, पेरू, लिंबू, सीताफळ, संत्रा, मोसंबी आदी फळांच्या लागवडीसाठी अनुदान (Anudana) दिले जाते. सन २०२४-२५ वर्षात 'मनरेगा' अंतर्गत ७८५ हेक्टर क्षेत्रावर ८१२ लाभार्थीनी फळबाग फुलवली असून, शेतकऱ्यांना यामधून चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी पारंपरीक पिकासोबत फळपिकाकडे वळत आहेत.

मनरेगातून फळबाग लागवडीस प्रोत्साहन

ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. चालू आर्थिक वर्षात ७८५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली.

कुठली झाडे लावता येतात?

फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जाते. आंबा, पेरू, लिंबू, सीताफळ, संत्रा, मोसंबी आदी फळांच्या प्रकारानुसार लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

रोजगाराबरोबर शाश्वत उत्पन्नाचा स्रोत

मनरेगाच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना राबविली जाते. यामधून ८१२ लाभार्थीनी मनरेगातून फळबाग लागवड केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराबरोबर शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे.

पात्रतेचे निकष काय?

किमान ०.०५ हे. व जास्तीत जास्त २.० हे. प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक यासह इतर काही निकष लागू.

अर्ज कसा करायचा?

'मनरेगा' अंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. तालुका व जिल्हा प्रशासनाने योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. संबंधित ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि मनरेगा विभाग यांच्याशी संपर्क साधता येतो.

किती अनुदान दिले जाते?

* या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात.

* पहिल्या वर्षी : ६० टक्के अनुदान (३० हजार रुपयांपर्यंत)

मनरेगातून किती हेक्टरवर फळबाग?

* सन २०२४-२५ वर्षात मनरेगा अंतर्गत ७८५ हेक्टर क्षेत्रावर ८१२ लाभार्थीना फळबाग लागवडीचा लाभ देण्यात आला आहे.

* सिंचनाची सोय होत असल्यामुळे अनेक शेतकरी आता फळबाग शेतीकडे वळत असल्याचे दिसून येते.

हे ही वाचा सविस्तर : Crop Insurance Scam: सीएससी केंद्र चालकांना बसला दणका; परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाफळेशेतकरीशेती