अकोला : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ७ एप्रिल रोजी पार पडली असून, विविध ९५ उद्योग-व्यवसायांसोबत जिल्ह्यात १ हजार २३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले.
त्यामध्ये १२० कोटी रुपयांची गुंतवणूक सीएनजी गॅस (CNG GAS) उत्पादनामध्ये करण्यात येणार असून, या उद्योगात शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा वापर करण्यात येणार असल्याने, या उत्पादनाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, तसेच रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. (Crop residues in the field)
यंदाच्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १ हजार २३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. रिलायन्स इंडिया लिमिटेड या उद्योग घटकांकडून १२० कोटी रुपयांची गुंतवणूक सीएनजी गॅस (CNG GAS) उत्पादनामध्ये करण्यात येणार आहे.
अकोला शहरापासून १० किलोमीटर अंतरावर चांदूर परिसरात सीएनजी वाहनांमध्ये गॅस (CNG GAS) भरण्याच्या उद्योगाची निर्मिती करण्यात येणार असून, त्याद्वारे जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील सीएजी वाहनांसाठी गॅस वितरित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उद्योगात शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा वापर होणार असून, त्याचा मोबदला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसेच या उद्योगामुळे रोजगारनिर्मितीही वाढणार आहे.
तरुणांना मिळणार रोजगार!
१२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सीएनजी गॅसनिर्मितीच्या (CNG GAS) या उद्योगात जिल्ह्यातील ३०० बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या वाढीसाठी मदत होणार आहे.
गुंतवणूक परिषदेतील सामंजस्य करारांपैकी १२० कोटी रुपये गुंतवणुकीचा सीएनजी गॅस उद्योग पर्यावरणपूरक आहे. या उद्योगासाठी शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा वापर होणार असून, त्यापोटी शेतकऱ्यांना मोबदला मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे, तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. - अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला
शेतकऱ्यांना मोबदला मिळणार; उत्पन्न वाढणार !
सीएनजी गॅस उद्योगासाठी कच्चा माल म्हणून शेतातील कापूस, सोयाबीन, गहू आदी पिकांचे टाकाऊ अवशेष व कुटाराचा वापर करण्यात येणार आहे. या टाकाऊ अवशेषांचा संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मदत होणार आहे. (Crop residues in the field)