Join us

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:09 IST

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भातशेती नष्ट होत चालली आहे. तालुक्यात शेतजमीन झपाट्याने संपुष्टात येत आहे.

पनवेल : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भातशेती नष्ट होत चालली आहे. तालुक्यात शेतजमीन झपाट्याने संपुष्टात येत आहे.

सिडकोनंतर एमआयडीसी, एमएमआरडीए, नैना, विरार, अलिबाग कॉरिडॉरनंतर उरली सुरली जमीनदेखील बिल्डरांच्या घशात चालली आहे.

यामुळे शेतकरी लवकरच उघड्यावर पडणार आहे. जमीनच शिल्लक राहणार नसल्याने पिढीजात शेती व्यवसाय पुढे करायचा कसा? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना सतावत आहे.

८२०० हेक्टरवर भातशेतीभातशेतीत कमालीची घट झाली आहे. पनवेलमध्ये साधारणतः भातशेती केली जाते. विविध प्रकल्पांमुळे पुढील काही वर्षांत ही भातशेतीदेखील नष्ट होणार आहे.

२० टक्के शेती राखीव ठेवा- शेती नष्ट होत असल्याने तालुक्यात किमान २० टक्के शेती राखीव ठेवावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी सज्जन पवार यांनी केली आहे.- स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग पवार यांनी केला आहे. येथे स्ट्रॉबेरीसारखी पिके यशस्वी होऊ शकतात.- त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी तालुक्यातील शेती नष्ट का केली जात आहे? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

जाणीवपूर्वक टाळले जाते झाडे, घरांचे सर्वेक्षणविरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात जमीन संपादित करतेवेळी झाडांचेदेखील सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर इतर प्रकल्पांसाठी केल्या जाणाऱ्या संपादनात झाडांची वेगळी नोंद केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट होणार आहे.

राजकारण्यांचे दुर्लक्ष- पनवेलमध्ये झपाट्याने शहरीकरण वाढत असल्याने राजकारणी केंद्रबिंदू म्हणून शहरी मतदाराकडे पाहू लागले आहेत.- शहरी मतदार ७० टक्के असल्याने उर्वरित ३० टक्के स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी नेते झगडताना दिसत नाही.- मोठ्या प्रमाणात शेतकरी देशोधडीला लागला आहे. याकडे शासनाचे लक्ष नसल्याची टीका होत आहे.

शासन नैनासारखा प्रकल्प राबवत आहे. त्यानंतर नष्ट होणारी झाडे, गुरे तसेच या जमिनीवरील घरांना काय मोबदला देणार याबाबत सुस्पष्टता नसल्याने स्थानिक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. - चंद्रकांत भगत, प्रगतशील शेतकरी

अधिक वाचा: शेतजमिनीवर गाळ कसा पसरवायचा? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीभातपीकरायगडपनवेलफलोत्पादनफळेसरकारराज्य सरकार