lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > PM Kisan चे ६ हजार रूपये मिळाले का? नसतील मिळाले तर हे करा

PM Kisan चे ६ हजार रूपये मिळाले का? नसतील मिळाले तर हे करा

agriculture farmer Did you get Rs 6 thousand of PM Kisan scheme If not do this | PM Kisan चे ६ हजार रूपये मिळाले का? नसतील मिळाले तर हे करा

PM Kisan चे ६ हजार रूपये मिळाले का? नसतील मिळाले तर हे करा

काल पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले

काल पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांसाठी सरकारने लागू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसानचा सोळावा हप्ता काल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्याचबरोबर या योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने वर्षाकाठी प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रूपये निधी देण्याची योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान योजना आखली आहे. तर काल (ता. २८) नमो शेतकरी महासन्मान योजेनेचे दोन हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे मिळून ६ हजार रूपये जमा झाले आहेत.

दरम्यान, पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. तर अनेक शेतकऱ्यांना केवळ पीएम किसानचे २ हजार रूपये मिळाले असून नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ४ हजार मिळाले नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. तर अशा शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्या.

नेमकं काय झालंय?
अनेक शेतकऱ्यांना केवळ एक किंवा दोन हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. तर काही शेतकऱ्यांना आज उशीरा पैसे जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे २ हजार रूपये मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे ४ हजार रूपये मिळणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना पैसे उशिराने मिळत आहेत अशी माहिती आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे २ हजार रूपये मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान  निधीचाही लाभ घेता येणार नाही. 

दरम्यान, २०१८ सालापासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत आत्तापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी ६ हजार रूपये दिले जातात. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे असे कोणतेही शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात. 

Web Title: agriculture farmer Did you get Rs 6 thousand of PM Kisan scheme If not do this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.