राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला आज शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.
या प्रवेशाची अंतरिम गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होईल. पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ३० जुलैला जाहीर होणार आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये १७ हजार ७७६ जागा आहेत.
यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६२६ जागा आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार १५० जागा आहेत.
राज्यामध्ये कृषीच्या कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती जागा?
बीएसस्सी कृषी - १२ हजार १७८
उद्यानविद्या - १,१०४
बीटेक (कृषी अभियांत्रिकी) - ८६४
बीटेक (अन्न तंत्रज्ञान) - १,४४०
बीटेक (जैवतंत्रज्ञान) - १,०४०
कृषी व्यवसाय व्यवस्थापन - ९४०
बी.एसस्सी सामुदायिक विज्ञान - ६०
बी.एसस्सी वनविद्या - ८२
बी.एसस्सी मत्स्य विज्ञान - ४०
दरम्यान पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागांची प्रसिद्धी २६ जुलैला तर पहिली फेरी ३० जुलैला जाहीर होईल.
अधिक वाचा: पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर