Join us

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्र सगरोळी सज्ज

By रविंद्र जाधव | Updated: May 27, 2025 21:32 IST

KVK Sagroli : देशभरात सुरू होणाऱ्या विकसित कृषि संकल्प अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी जिल्हा नांदेड यांनीही संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, या अभियानामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.

देशभरात सुरू होणाऱ्या विकसित कृषि संकल्प अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी जिल्हा नांदेड यांनीही संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, या अभियानामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.

या अभियानाचा शुभारंभ २९ मे २०२५ रोजी ओडिशातील पुरी येथे केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा अभियान १५ दिवस चालणार असून, या कालावधीत देशातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमधील सुमारे १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट संवाद साधण्यात येणार आहे.

कृषि विज्ञान केंद्र सग्रोळीची भूमिका

सग्रोळी येथील प्रमुख शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी विशेष कार्ययोजना आखण्यात आली आहे. या योजनेत पुढील बाबींचा समावेश आहे.

• खरीप हंगामातील लागवड, तण व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण व जलसंधारण यावर प्रात्यक्षिकांचे आयोजन.

• मृदा चाचणी अहवालावर आधारित खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन.

• पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN), प्रधानमंत्री फसल विमा योजना, अटल भूमी सुधार योजना यांसारख्या शासकीय योजनांची माहिती.

• स्मार्ट व विज्ञानाधिष्ठित शेती पद्धतीचे प्रशिक्षण.

• मुलाखती, चर्चासत्रे व संवाद कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे.

• शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या आधारे भविष्यातील संशोधनाची दिशा निश्चित करणे.

‘या’ ८ तालुक्यांत राबणार अभियान

नांदेड जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी हे या अभियानाचा भाग म्हणून ८ तालुक्यांत काम करणार आहे. यात बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांतील ९० गावांमध्ये विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रत्येक गावात तज्ज्ञ शास्त्रज्ञांची उपस्थिती राहणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शंका व अडचणींवर थेट मार्गदर्शन दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

कृषि विज्ञान केंद्र सग्रोळी तर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या उत्पादनक्षमतेत वाढ साधावी.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशिवराज सिंह चौहानशेतीपीक व्यवस्थापननांदेडनांदेडमराठवाडा