lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > मराठवाड्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेला मान्यता

मराठवाड्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेला मान्यता

Accreditation of Pesticide Testing Laboratory to promote natural and organic farming in Marathwada | मराठवाड्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेला मान्यता

मराठवाड्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेला मान्यता

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कीटकनाशक चाचणी आणि अवशेष विश्लेषण प्रयोगशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कीटकनाशक चाचणी आणि अवशेष विश्लेषण प्रयोगशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या दि.०८.०१.२०२४ रोजी झालेल्या ३४ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या बैठकीमध्ये, "Establishment of Advanced Pesticide Testing and Residue Analysis Laboratory to encourage Natural Farming and Organic Production" हा प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे.

या प्रकल्पास राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने मान्यता दिल्यानुसार संचालक (संशोधन), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी यांच्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत "Establishment of Advanced Pesticide Testing and Residue Analysis Laboratory to encourage Natural Farming and Organic Production" हा प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रकल्पाच्या एकूण रु.८६३.०२ लाख (अक्षरी रु. आठ कोटी, त्रेसष्ठ लाख, दोन हजार) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

Web Title: Accreditation of Pesticide Testing Laboratory to promote natural and organic farming in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.