जगदीश कोष्टीसातारा : दहावी, बारावी, पदवीधर झालेले अनेक तरुण शेती करायला तयार नाही. बहुतांश युवा शेतकरीशेतीत दम राहिला नाही म्हणून पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन कुठं तरी नोकरी करतात.
पण सातारा तालुक्यातील पाडळी येथील हृषीकेश ढाणे याला अपवाद ठरले. विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेऊनही ते शेती करतात. शेतातून वेगवेगळे प्रयोग करतात. यातूनच त्यांनी तीन एकर शेतात कोरफडचे उत्पादन घेतले.
जिल्ह्यातील शेतकरीही विविध प्रयोग करण्यावर भर देतात; पण आजवर कोरफडीची शेती करण्याचा फारसा कोणी विचार केला नाही. हा विचार पाडळी येथील हृषीकेश ढाणे यांनी केला.
शेतकऱ्यांना नवीन संधीत्यांच्या यशस्वी कोरफड शेतीमुळे त्यांना एक नवा मार्ग मिळाला आहे. त्यांच्या या यशस्वी व्यवसायामुळे शेतकऱ्यांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
प्रसाधन आणि औषधी कंपन्यांनाकडून मागणीऔषधनिर्माण कंपन्यांकडून मागणी हृषीकेश ढाणे यांनी कोरफड शेतीसाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आणि जलसिंचनासाठी कार्यक्षम तंत्रज्ञान वापरले. यामुळे त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यांनी कोरफड उत्पादने पुणे आणि मुंबईतील प्रसाधन आणि औषधी कंपन्यांना विकली. ज्यामुळे त्यांना चांगला फायदा मिळाला.
शेतीला एक नवीन दिशा देण्याचा निर्णय- पाडळीतील बहुतांश शेतकरी ज्वारी, बाजरी किंवा सोयाबीनची शेती करतात. हृषीकेश ढाणे याला अपवाद ठरले.- त्यांनीही सुरुवातीस ज्वारी, बाजरी आणि सोयाबीनची शेती केली होती.- हृषिकेश ढाणे यांनी शेतीला एक नवीन दिशा देण्याचा निर्णय घेतला.- २००७ मध्ये त्यांच्या शेजारील शेतकऱ्याकडून ४ हजार कोरफडची रोपे घेतली. ती आपल्या शेतात लावली.- त्यानंतर त्यांनी ३ एकर जागेवर कोरफडची लागवड केली. त्यांनी भरभरून उत्पन्नही मिळत आहे.
ट्रोलर्समुळेच मोठा त्रासहृषीकेश ढाणे हे पदवीधर शेतकरी आहेत. त्यांनी कृषी विषयातून पदवी घेतली आहे. त्यातून कोरफडीचे उत्पादन करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला अन् तो यशस्वी केलाही. काही तरुणांनी कौतुकाने त्यांची यशोगाथा समाजमाध्यमावर टाकली; पण त्याला सिमेंटच्या जंगलात बसून मोबाइलवर खेळणाऱ्या तरुणांनी ट्रोल केले. प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी नको ते प्रश्न विचारले जाऊ लागल्याने आता आणखी प्रसिद्धी नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ हृषीकेश यांच्यावर आली आहे.
शेतात काहीतरी प्रयोग करण्याचा निर्धार केला अन् त्यात सातत्य ठेवले तर निश्चितपणे चांगले उत्पादन मिळू शकते. केवळ यासाठी मेहनत करण्याची तयारी असायला हवी. - हृषीकेश ढाणे, शेतकरी
अधिक वाचा: दुष्काळी जत भागात या शेतकऱ्याने केशर आंबा पिकातून केली क्रांती; वाचा सविस्तर