Join us

प्राण्यांच्या सेवेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा चालता फिरता दवाखाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:29 PM

निःस्वार्थ भावनेने प्राणी सेवा करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने प्राण्यांसाठी चालता फिरता मोफत दवाखाना सुरू करून अपघातग्रस्त व आजाराने ग्रासलेल्या हजारो जनावरांना जीवदान दिले आहे. गाय, म्हैस, बैल, कुत्रे, मुंगूस, घोडा यासह विविध जनावरांना त्यांनी जीवदान दिले आहे. 

गोविंद शिंदे 

नांदेड जिल्ह्यातील बारूळ येथील खुदुसाब शेख असे या प्राणीप्रेमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यांनी चाळीस वर्षे सेवा केल्यानंतर ते आता सेवानिवृत्त होऊन प्राण्यांचे दुःख कमी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. खुदुसाब शेख यांनी पशुवैद्यकीय दवाखाना बारुळ, कुरुळा, कोलंबी, पेठवडज या ठिकाणी सेवा केली.

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी 

पशुवैद्यकीय सेवकापासून ते कंपाउंडर त्यांची कामगिरी पाहून शासनाने त्यांना बढती दिली. पशुवैद्यकीय दवाखान्याला वैद्यकीय अधिकारी नसतानाही त्यांनी या सेवेतून आजपर्यंत १ हजार १०० जनावरांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीबद्दल अनेकांनी त्यांचे वेळोवेळी कौतुक केले आहे हे विशेष. 

मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले

प्राण्यावर प्रेम करून पाहा. ते तुम्हाला प्रेम परत देतील. भटक्या बेवारस प्राण्यांना हक्काचे निवारा उभा करण्यासाठी शासनाने व समाजाने पुढे यावे. अजूनही मुक्या प्राण्यांची मोफत सेवा करत आहे. यामध्ये माझ्याकडून हजारो जनावरांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले आहे. - खुदुसाब शेख, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय कर्मचारी, बारूळ

टॅग्स :दुग्धव्यवसायगायऔषधंशेतीनांदेडमराठवाडा