lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार

पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार

A credit card will also be available along with the honor fund | पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार

पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार

किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. तसेच ही मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. तसेच ही मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या तीन महिन्यांत किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच केली. या योजनेची सुरुवात झाली आहे. किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. तसेच ही मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे.

या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डही मिळणार
-
पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरावर ३ लाख रुपये कर्ज देण्यात येते.
- शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर भरली तर त्यामध्ये ३ टक्के सवलत दिली जाते.
- ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नाही त्यांना बँकामार्फत कार्ड देण्यात येणार आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत अभियान
या मोहिमेमुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या कृषी व्यवसायांना चालना देण्यासाठी पत सुविधा मिळणार आहे. ही मोहीम १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीपर्यंत सुरु राहील.

कोठे साधायचा संपर्क
सर्व सरकारी, खासगी, सहकारी आणि स्थानिक बँका हे क्रेडिट कार्ड देऊ शकतात. तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर, म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन यासाठी अर्ज दाखल करू शकता.

प्रक्रिया सोपी
किसान सन्मान लाभार्थीना हे क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी पिकाचा तपशील, ओळखपत्राची फोटो कॉपी (झेरॉक्स) आणि एकपानी अर्ज एवढे जमा करावे लागणार आहे.

Web Title: A credit card will also be available along with the honor fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.