Join us

घरच्या घरी नैसर्गिकरित्या केळी पिकविण्याच्या सोप्या ३ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 17:50 IST

शरीराला फायद्याची केळी पिकवा घरच्या घरी

बाजारात मिळणारी केळी केमिकल द्वारे पिकविलेली आहे की नाही? हे ठरवणे तसे कठीण आहे. मात्र या केळीच्या सेवनाने मनुष्य आजरी पडतील हे मात्र निश्चित सांगता येईल. अशा वेळी कच्ची केळी घरीच पिकवून खाण्यास मिळाली तर? किती उत्तम होईल. 

घरी अगदी सहज केळी नैसर्गिकरित्या पिकवू येते. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही एक दोन दिवसांत सहज घरीच केळी पिकवू शकता. आणि या घरी पिकविलेल्या केळीच्या सेवनाने तुम्हाला कोणतीच हानी देखील होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या टिप्स विषयी.

केळी पिकविण्यासाठी गवताची मदत

एक ते दोन दिवसांत कच्ची केळी पिकविण्यासाठी आपल्या परिसरात असलेले हिरवे गवत कापून उन्हात ठेवा. ते सुकल्यानंतर ते एका कागदावर ठेवून द्या. त्यात कच्ची केळी ठेवून थंड ठिकाणी ठेवून द्या. दोन ते तीन दिवसांत कच्ची केळी पिकून तयार होईल.

कागदी पेपर बॅग

जर तुम्हाला केळी लवकर पिकवायची असेल तर पेपर बॅगचाही वापरु शकता. केळी पेपरमध्ये ठेवल्याने ती पिकते. यासाठी सर्वप्रथम केळीला एका पेपरमध्ये चांगल्या प्रकारे गुंडाळून घ्या. आता ती पेपर बॅगमध्ये टाकून किचनमध्ये ठेवून द्या. एक ते दोन दिवसांत नैसर्गिक पद्धतीने केळी पिकून तयार होते.

घरातील तांदळाचा डबा

केळीला नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यासाठी आणखी एक पद्धत म्हणजे तांदूळ. केळीचा वरचा भाग प्लास्टिकने गुंडाळा. त्यानंतर पेपर बॅग किंवा न्यूज पेपरमध्ये ठेवा आणि तांदळात ठेवून द्या. या प्रक्रियेतून एक ते दोन दिवसांत कच्ची केळी पिकवून तयार होते.

या तीन पैकी कोणतेही एक पद्धत वापरुन तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक रित्या केळी पिकवून खाऊ शकतात. 

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

टॅग्स :केळीशेतकरीपीकफळेआरोग्य