केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यूआर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार आहे.
या क्यूआर कोडसह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार असून, या योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा.
येत्या खरीप हंगामात महाबीजचे सर्व प्रमाणित बियाणे ह साथी पोर्टलमधून नोंदणी केलेले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यूआर कोड असणार आहे.
हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेले स्त्रोत बियाणे कोठून मिळाले, या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे.
बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हे बियाणे १०० टक्के शुद्ध असल्याची एकप्रकारे खात्रीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यस्तरीय खरीप २०२५ हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमतेकरिता केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या साथी पोर्टलचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर