चोरट्यांनी दोन एकर शेतातील कापसाची वेचणी करून तो कापूस चोरून नेला. त्या कापसाची एकूण किंमत ९६ रुपयांच्या आसपास आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या वेलतूर (ता. कुही) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पचखेडी नजीकच्या दहेगाव शिवारात सोमवारी (दि.०२) मध्यरात्री घडली असून, मंगळवारी (दि.०३) फेब्रुवारी सकाळी उघडकीस आली.
गुणवंत लांजेवार, रा. पचखेडी (गां.), ता. कुही यांची दहेगाव (ता. कुही) शिवारात तीन एकर शेती असून, त्यांनी या वर्षी तिन्ही एकरात कपाशीची लागवड केली आहे. ते पचखेडी (गां) येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षदेखील आहेत.
त्यांनी या कपाशीचे दोन वेचणीचा कापूस वेचून घरी आणला होता. सोमवारी शेतात भरपूर कापूस फुटला असल्याने त्यांनी तिसऱ्या वेच्यासाठी मंगळवारी सकाळी मजूर शेतात पाठविले. त्यावेळी त्यांना झाडांना खूपच कमी कापूस शिल्लक असल्याचे आढळून आले. हा कापूस चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
चोरट्यांनी किमान १२ क्विंटल कापूस चोरून नेला असून, त्या कापसाची किंमत ९६ हजार रुपयांच्या आसपास असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कापूस चोरट्यांना शक्य तेवढ्या लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
Web Summary : Thieves stole 12 quintals of cotton, worth ₹96,000, from a farmer's two-acre field in Dahegaon. The incident occurred Monday night. Police are investigating the theft after the farmer reported it Tuesday morning.
Web Summary : दहेगाँव में एक किसान के दो एकड़ खेत से चोरों ने ₹96,000 की 12 क्विंटल कपास चुरा ली। घटना सोमवार रात हुई। किसान द्वारा मंगलवार सुबह रिपोर्ट दर्ज कराने के बाद पुलिस चोरी की जांच कर रही है।