Join us

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या १ हजार ६२ सेवा थेट ग्रामपंचायतीतून मिळणार; काय आहे निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:51 IST

aple sarkar kendra update ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे.

ग्रामविकास विभागाने अधिसूचित केलेल्या सेवांचा विस्तार करत राज्य सरकारच्या विविध विभागांच्या १ हजार ६२ सेवा आता थेट १ हजार १४ ग्रामपंचायतीत कार्यरत होणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

यासाठी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील १ हजार ८७ ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत १ हजार १४ ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत.

सदर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून, तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे.

लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा दिलासा एका ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

अधिक वाचा: मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा

टॅग्स :ग्राम पंचायतराज्य सरकारऑनलाइनसरकारशासन निर्णयसरकारी योजनाजिल्हा परिषदग्रामीण विकास