Join us

उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांच्या बियाण्यासाठी १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:25 IST

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत.

सदर बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत भुईमुग पिकासाठी कोल्हापूर/सातारा/सांगली/ पुणे/अहिल्यानगर/नाशिक/धुळे या ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना व तीळ पिकासाठी जळगाव/लातूर/बीड/बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे.

यासाठी महाडीबीटी च्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या घटका अंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमुग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे.

इच्छुक शेतकऱ्यांना दि.७ फेब्रुवारी, २०२५ पासून दि.१० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत नमूद पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

तरी, वरील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक वाचा: Soybean Kharedi : महाराष्ट्र सोयाबीन खरेदीत देशात अव्वल; हमी भावाने किती सोयाबीन खरेदी?

टॅग्स :कृषी योजनाशेतकरीशेतीपीकलागवड, मशागतराज्य सरकारसरकारखते