Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > ब्रॉयलर कोंबडी पालनात आधुनिक तंत्राचा वापर केल्यास मिळेल कमी दिवसात अधिक उत्पन्न

ब्रॉयलर कोंबडी पालनात आधुनिक तंत्राचा वापर केल्यास मिळेल कमी दिवसात अधिक उत्पन्न

Using modern techniques in broiler chicken farming will give more income in less days | ब्रॉयलर कोंबडी पालनात आधुनिक तंत्राचा वापर केल्यास मिळेल कमी दिवसात अधिक उत्पन्न

ब्रॉयलर कोंबडी पालनात आधुनिक तंत्राचा वापर केल्यास मिळेल कमी दिवसात अधिक उत्पन्न

ब्रॉयलर (मांसल) कोंबड्यांचे व्यवस्थापन

ब्रॉयलर (मांसल) कोंबड्यांचे व्यवस्थापन

शेअर :

Join us
Join usNext

थोड्या काळात शरीरवाढीतून जास्तीचे मांस उत्पादन करून खाण्यासाठी विशिष्ट पक्षी वापरतात त्यांना ब्रॉयलर (मांसल) कोंबड्या असे म्हणतात. अलीकडे मांसल कोंबड्यांच्या जोपासन पद्धतीत अधिक विकसित झाल्या आहेत. दोन उच्च जातीच्या संकराने अशी जात तयार होते.

ब्रॉयलर पक्षी खालेल्या अन्नाच्या मानाने जास्त प्रमाणात मांस तयार करतात व त्यांची वाढ झपाट्याने होते. साधारणतः ८ ते १० आठवड्‌यात त्या विक्री योग्य होतात. मांसल कोंबड्यांचे मटन इतर मटनापेक्षा मऊ व रुचकर असते. आधुनिक तंत्राचा वापर केल्याने कमी दिवसात अधिक उत्पन्न मिळते व उत्पादनावर खर्चही कमी येतो. हा व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी खालील बाबींवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

१) मांसल जातीच्या पिल्लांची खाद्य खाण्याची क्षमता आजमावून योग्य प्रतीचे खाद्य पुरेशा प्रमाणात खाऊ घालणे. २) मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी योग्य काळजी घेणे. ३) दैनंदिन होणा-या शरीर वाढीची नोंद ठेवणे व त्यानुसार आहार ठरविणे. ४) दैनंदिन खर्चाचा हिशोब ठेवणे. ५) आधुनिक संगोपन पद्धतीचा अवलंब करून पिल्ले वाढविणे.

ब्रॉयलर (मांसल) कोंबड्या तीन प्रकारे वाढविता येतात.

डीप लिटर पद्धत (गादी पद्धत) या पद्धतीत ० ते ४ आठवड्यापर्यंतच्या पिल्लांना प्रत्येकी अर्धा चौरस फुट व ४ ते १० वयापर्यंतच्या वाढत्या पक्षांना एक चौरस फुट जागा त्याची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी आवश्यक असते. साधारपणे २००ते३०० पिल्लांचे लहान लहान गट करून वाढविल्यास त्यांची वाढ व्यवस्थित होते. गादीसाठी बंदिस्त जाळीचे घरामधील जमिनीवर भाताचे तूस, शेंगांचे टरफल, लाकडाचा भुसा किंवा इतर स्वच्छ कोरड्या पदार्थाचा उपयोगह केला जातो.

या जमिनीवर दोन ते तीन इंच जाडीचा ठार देवून पिल्ले ठेवली जातात. पिल्ले प्रथम गादीवर सोडण्यापूर्वी गादीचा पृष्ठ भाग कागदाने झाकून द्यावा म्हणजे पिल्ले गादीसाठी वापरलेले पदार्थ खाणार नाहीत. गादी पद्धतीच्या घरात योग्य प्रकारचे वायू विजन असावे म्हणजे हवा खेळती राहील व पक्षांना ताज्या व स्वच्छ हवेचा पुरवठा होईल. पिल्लांच्या घरातील तापमान ७० डी. फॅ. असावे यासाठी हवा खेळती राहणे आवश्यक असते. उन्हाळ्यातील घरातील तापमान ९० डी. फॅ. च्यावर जाऊ देवू नये. मांसल  कोंबड्या ठेवायचे घर हवेशीर व भरपूर प्रकाश येणारे असावे. पक्षांना निदान १६ तास चांगला उजेड मिळावयास हवा.

कोंबड्यांचे खाद्य : भरपूर शरीरवाढ होण्याकरिता या पक्षांना अधिक उर्जा व प्रथिनेयुक्त खाद्य आवश्यक असते. त्यामुळे अन्नाचे मांसात रुपांतर होते. खाद्यातील मका, ज्वारी, वगैरे सारखे धान्य पचनास सुलभ असतात. प्रथिनांमुळे मांस तयार होण्यास मदत होते. पिष्टमय पदार्थ व मेद यामुळे ऊर्जानिर्मिती होते. मांसल पक्षांचा वाढीचा काळ हा दोन विभागात विभागलेला असतो.

वाढीचा आरंभिक काळ हा ० ते ४ आठवड्यांपर्यंत असून त्यानंतर विक्रीपर्यंत दुसरा काळ असतो. आरंभिक खाद्यामध्ये प्रतिकिलो मध्ये २९०० किलो कॅलरीज चयापचयक्षम उर्जा आवश्यक असते. त्याचप्रमाणे या खाद्यात २२ ते २४ टक्के प्रथिने असतात. वरील गरजेबरोबरच उर्जा व प्रथिने यांचे योग्य प्रमाण असावे लागते. वाढीच्या शेवटच्या काळात ४ ते १० आठवडे दिल्या जाणा-या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण थोडेसे कमी म्हणजे १९ ते २० टक्के असून उर्जेचे प्रमाण अधिक म्हणजे ३०० कि. कॅलरीज असते.

पाण्याची भांडी : १०० पिल्लांना पाणी पिण्यासाठी खालील प्रमाणांत जागा आवश्यक असते. एक दिवस ते दोन आठवडे वयाची पिल्ले दोन लिटर क्षमता असणारी लांब, पन्हाळी प्रकारची भांडी. तीन आठवड्‌यापासून नऊ आठवडे वयाचे पक्षी- दोन गॅलन क्षमतेची पाण्याची भांडी पक्षांना पाण्यासाठी दहा फुटापेक्षा लाब जावे लागू नये म्हणून पाण्याची भांडी योग्य अंतरावर ठेवावी. पाणी सांडून लिटर ओले होवू नये म्हणून प्रत्येक भांड्याखाली लाकडी फळी ठेवावी, दररोज पक्षांना स्वच्छ व ताज्या पाण्याचा पुरवठा करणे चांगले असते.

खाद्याची भांडी पक्षांना खाय देण्यासाठी विविध प्रकारची भांडी वापरली जातात. १०० पक्षांना वयाच्या ४ आठवड्‌यापर्यंत ५० इंच लांबीची खाद्याची भांडी असावीत. प्रत्येक पक्षास दोन इंच जागा खाद्य खाण्यासाठी असावी, पक्षी जसे मोठे होत जातात तसे खाद्याच्या भांड्याची उंची वाढवावी, भांडी अर्ध्यापेक्षा अधिक भरू नयेत.

व्यवस्थापना विषयक इतर बाबी : मांसल कोंबड्यांच्या पिल्लांची जोपासना अंड्यासाठी कोंबडी पालन करतांना ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे करावी. पिल्ले येण्यापूर्वी ब्रुडर तयार करून ठेवावी. विद्युत पुरवठा व्यवस्था, खाय, पाणी इत्यादी आवशयक बाबी ठेवाव्यात.

पहिले दोन आठवडे : पिल्ले येताच त्यांना बुडरखाली ठेवावे. पक्षांची एकंदर स्थिती पाहून उष्णता कमी जास्त करावी. पुरेशी उष्णता नसल्यास पिल्ले एकत्र गर्दी करतात. योग्य उष्णतामान असल्यास ती सर्वच समप्रमाणात विखुरलेली असतात व स्वतंत्रपणे फिरतात. पिल्ले चार दिवसाची होताच त्यांची खाद्य भांडी, ब्रुडरपासून २ फुट अंतरावर ठेवावीत.

सभोवती संरक्षककडे बसवावे पाणी पिण्यासाठी जागा वाढवून द्यावी. ओले लिटर काढून त्या ठिकाणी कोरडे लिटर टाकावे. एक आठवड्यानंतर बुडरचे तापमान ५ डी. फॅ. ने कमी करावे. गादी पद्धतीमध्ये पिल्लांना लहान वयापासून आठ आठवडेपर्यंत सतत प्रकाश योजना केलेली असावी. पिसे उपटणे, एकमेकांस टोचणे इत्यादी प्रकारांना आळा असावा म्हणून योग्य वेळी वरील चोच कापणे इष्ट ठरते.

रोगप्रतिबंधक उपाय : एक दिवसाचे पिल्लांना 'राणीखेत' रोगाची लास टोचून घ्यावी. जोपासना काळात होणारा महत्वाचा रोग म्हणजे 'रक्ती हगवण' या रोगाचे जंतू ओल्या लिटरवर वाढत असतात म्हणून लिटर नेहमी कोरडे ठेवावे लागते. खाद्यातून 'रक्ती हगवण' प्रतिबंधक औषधाचा उपयोग करावा.

पिंजरा पद्धत : मांसल कोंबड्या वाढविण्याची दुसरी पद्धत म्हणजे पिंजरा पद्धत. ब्रॉयलरची पिल्ले ४ आठवड्यापर्यंत बुडरमध्ये जोपासली जातात त्यानंतर त्यांना मोठ्या पिंज-यामध्ये हलविले जाते. पिल्ले नेहमी जाळीवर असतात त्यामुळे विष्ठा एकतर सरळ जमिनीवर पडते किंवा अॅसबेसटॉसच्या पत्र्यावर पडते. त्यामुळे रोगराई कमी होते. एकावर एक मजले असलेल्या इमारतीप्रमाणे पिंज-यावरती पिंजरा ठेवूनही पुल्ले वाढविता येतात.

त्यामुळे थोड्या जागेत अनेक पक्षी ठेवता येतात. या पद्धतीत सुरुवातीची आर्थिक गुंतवणूक मोठी असते पण व्यवस्थापनास हि पद्धत चांगली आहे. तीस-या पद्धतीमध्ये पक्षी उघड्यावर भटकत राहतात रात्री त्यांना पकडून खुराड्यात ठेवले जाते. या मोकाट पद्धतीमध्ये खाद्यावरील खर्च कमी होत असला तरी कुत्री, मांजरे, चोरटे यापासून धोखा असतो त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवावे लागते. 

१०० मांसल पक्षांना दर आठवड्‌याला लागणारे खाद्य व पाणी यांचे प्रमाण

पक्षांचे वय दर आठवड्यास लागणारे
 खाद्य (किलो)पाणी (लिटर)
१ ला आठवडा ८.४१४.००
२ ला आठवडा१७.५२८.००
३ ला आठवडा३०.०१४७.०६
४ ला आठवडा३९.०२६४.०४
५ ला आठवडा४९.०७८६.०८
६ ला आठवडा५६.०७१००.०८
७ ला आठवडा६७.०२१२०.०४
८ ला आठवडा७४.०२१३७.०२
एकूण३४३.००५९९.०२

लेखक : प्रा. संजय बाबासाहेब बडे
कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर - ४२३७०३ मो.नं. ७८८८२९७८५९

Web Title: Using modern techniques in broiler chicken farming will give more income in less days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.