Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > मांस व अंडी असा दुहेरी नफा देणारी ही कोंबड्याची जात ठरतेय फायदेशीर; वाचा सविस्तर

मांस व अंडी असा दुहेरी नफा देणारी ही कोंबड्याची जात ठरतेय फायदेशीर; वाचा सविस्तर

This breed of chicken that provides the dual benefits of meat and eggs is becoming profitable; Read in detail | मांस व अंडी असा दुहेरी नफा देणारी ही कोंबड्याची जात ठरतेय फायदेशीर; वाचा सविस्तर

मांस व अंडी असा दुहेरी नफा देणारी ही कोंबड्याची जात ठरतेय फायदेशीर; वाचा सविस्तर

परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्याच्या योग्य जातीची निवड करणे महत्वाचे आहे. यात ब्लॅक अॅस्ट्रालॉर्प ही जात दुहेरी बाजूने फायदेशीर ठरते.

परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्याच्या योग्य जातीची निवड करणे महत्वाचे आहे. यात ब्लॅक अॅस्ट्रालॉर्प ही जात दुहेरी बाजूने फायदेशीर ठरते.

परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्याच्या योग्य जातीची निवड करणे महत्वाचे आहे. यात ब्लॅक अॅस्ट्रालॉर्प ही जात दुहेरी बाजूने फायदेशीर ठरते.

ब्लॅक अॅस्ट्रालॉर्प ही प्रामुख्याने अंडी देणारी जात आहे. अंगावर भरपूर पिसे असल्याने ही कोंबडी गुबगुबीत दिसते. वृत्तीने शांत असते.

त्यामुळे पाळायला सोपी असते. ब्लॅक अॅस्ट्रॉलॉर्प कोंबड्या मोकळ्या चरुन खात असल्यानं परसातील  कुक्कुटपालनासाठी ही जात योग्य आहे.

ब्लॅक अॅस्ट्रॉलॉर्पची वैशिष्ट्ये
१) रंगाने काळी आणि भरपूर पिसे असतात. 
२) रोगाला प्रतिकारक्षम आहे. 
३)  छोट्या व मोठ्या प्रमाणात कोंबडीपालन करण्यास योग्य. 
४) वजनाने जड असल्याने मांस व अंडी असा दुहेरी फायदा आहे. 
५) पूर्ण वाढ झालेली कोंबडी सहा महिन्यात ३ किलो वजनाची भरते. 
६) पूर्ण वाढ झालेला कोंबडा ३.५ ते ४ किलो वजनाचा असतो. 
७) अंड्याचा रंग करडा किंवा तांबूस तपकिरी आणि आकार मोठा असतो. 
८) वयाच्या २० व्या आठवड्यापासून अंडी देण्यास सुरूवात होते. 

कुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळपास ७० ते ८०% खर्च खाद्यावर होतो. त्यामुळे जे खाद्य वापरलं जाईल ते समतोल असावे. वयोमानानुसार खाद्य व्यवस्थापन केले पाहिजे. त्यामध्ये प्रथिने आणि इतर अन्नघटकांचे प्रमाण योग्य असावे.

शेतकरीमहिलांसाठी परसातील कुक्कुटपालन हा चांगला जोड व्यवसाय ठरू शकतो. यात तुम्ही देशी व सुधारित कोंबड्यांच्या जाती घेऊन आपला व्यवसाय सुरु करू शकता.

अधिक वाचा: कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखाल? वाचा सविस्तर

Web Title: This breed of chicken that provides the dual benefits of meat and eggs is becoming profitable; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.