परसातील कुक्कुटपालन हा ग्रामीण भागातील लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे उत्तम साधन आहे. या व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक करण्याची गरज नसते. उपलब्ध असलेल्या कमीत कमी भांडवलात सुरुवातीला फक्त १०-१५ कोंबड्या घेतल्या तरी चालतात.
रोज मिळणाऱ्या अंड्यांची विक्री किंवा काही दिवसांनी तयार होणाऱ्या कोंबड्यांच्या मांसाची विक्री करून नियमित उत्पन्नाच्या माध्यमातून रोजचा थोडाफार खर्च भागवता येतो.
सुरुवातीला कमी पक्ष्यांपासून सुरुवात करून नंतर हळूहळू ५०, १०० किंवा त्याहून अधिक पक्ष्यांपर्यंत व्यवसाय वाढवता येतो. यातून मासिक उत्पन्नही वाढत जाते.
देशी कोंबड्या
◼️ स्थानिक देशी कोंबड्या या पारंपारिक पद्धतीने गावोगावी पाळल्या जातात.
◼️ त्यांच्याकडून मिळणारे अंड्यांचे उत्पादन साधारणतः प्रतिवर्ष ५० ते ८० एवढे असते.
◼️ मांस उत्पादन १ ते १.५ किलो एवढे असते.
◼️ देशी कोंबड्यांची काही वैशिष्ट्ये अशी की त्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते
◼️ कमी खर्चिक गुंतवणूक (नैसर्गिक खाद्यावर वाढतात)
◼️ बाजारात यांच्या मांसाच्या चवीसाठी आणि देशी अंड्यांसाठी कायम मागणी असते.
सुधारित देशी कोंबड्या
◼️ स्थानिक देशी कोंबड्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांनी विविध सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती विकसित केल्या आहेत.
◼️ या जाती ग्रामीण परिस्थितीत तग धरणाऱ्या असून, त्यांची वाढ व अंड्यांचे उत्पादन स्थानिक देशी कोबड्यांपेक्षा जास्त असते.
◼️ अंडी उत्पादन साधारणत १५० ते २०० अंडी प्रतिवर्ष एवढे असते.
◼️ त्यांचे वजन साधारण १.५ ते २.५ किलो पर्यंत जाते.
◼️ यांचे अंडे व मांसाला कायम मागणी असल्यामुळे चांगले उत्पन्न मिळते.
◼️ काही प्रचलित सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत वनराज, गिरीराज, कावेरी, सोनाली, श्रीनिधी, इत्यादी.
अधिक वाचा: राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी; बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा?