Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > Poultry Farming : 'असे' खाद्य कोंबड्यांना दिल्यास मरतूक वाढेल, खाद्याबाबत 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Poultry Farming : 'असे' खाद्य कोंबड्यांना दिल्यास मरतूक वाढेल, खाद्याबाबत 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Poultry Farming : | Poultry Farming : 'असे' खाद्य कोंबड्यांना दिल्यास मरतूक वाढेल, खाद्याबाबत 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Poultry Farming : 'असे' खाद्य कोंबड्यांना दिल्यास मरतूक वाढेल, खाद्याबाबत 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Poultry Farming : कोंबडी खाद्य नियोजन म्हणजे कोंबड्यांसाठी योग्य आणि संतुलित आहाराचे (poultry Farm Feed) नियोजन करणे.

Poultry Farming : कोंबडी खाद्य नियोजन म्हणजे कोंबड्यांसाठी योग्य आणि संतुलित आहाराचे (poultry Farm Feed) नियोजन करणे.

शेअर :

Join us
Join usNext

Poultry Farming : कोंबडी खाद्य नियोजन म्हणजे कोंबड्यांसाठी योग्य आणि संतुलित आहाराचे (poultry Farm Feed) नियोजन करणे. यामध्ये कोंबड्यांना आवश्यक असलेले पोषक घटक, त्यांचे प्रमाण आणि खाऊ घालण्याची योग्य वेळ यांचा समावेश असतो. कोंबड्यांच्या आहाराबाबत नेमकं समजून घेऊयात.... 

असे करा कोंबडी खाद्य नियोजन 

  • अयोग्य साठवण व चुकीच्या हाताळणीमुळे पावसाळ्यात खाद्यामधून अनेक रोगांची बाधा होण्याची शक्यता असते.
  • खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. ही खोली गळकी असू नये. 
  • पोत्यांखाली लाकडी फळ्या ठेवून जमिनीपासून पाच ते सहा इंच उंचावर पोती रचावी.
  • खाद्याची साठवणूक फक्त एक आठवड्यांसाठी करावी. 
  • जास्त दिवस खाद्य साठवून ठेवल्यास त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका संभवतो.
  • साठवणुकीच्या खोलीत किडे, झुरळे, उंदीर, घुशी इत्यादींचा शिरकाव होऊ देऊ नये.
  • जमीन किंवा भिंती ओलसर असू नयेत. जमीन व भिंती काँक्रीटच्या असाव्यात.
  • खाद्य वापरण्यापूर्वी त्यात गाठी झाल्या आहेत का, हे तपासावे. 
  • खाद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गाठी झाल्यास असे खाद्य कोंबड्यांना देऊ नये.
  • ओल्या खाद्यातून बुरशीजन्य रोगांची लागण होते, कोंबड्याच्या मरतुकीचे प्रमाण वाढते. 
  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खाद्यामध्ये बुरशीजन्य विषबाधा विरोधक (टॉक्सिन बाइंडर) आणि रक्ती हगवणरोधी (कॉक्सीडियोसिस विरोधक -कॉक्सिडिओस्टेंट) औषधे योग्य प्रमाणात मिसळून द्यावे.
  • खाद्याचे नमुने जैविक चाचणी व अन्नघटकांच्या पृथक्करणासाठी प्रयोगशाळांकडून तपासणी करून घ्यावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Poultry Farming :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.