Poultry Farm Care : कोंबड्यांसाठी स्वच्छ आणि ताजे पाणी नेहमी उपलब्ध असायला हवे. त्यांना दिवसातून अनेक वेळा पाणी पिण्याची गरज असते. पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाणी असल्याने कोंबड्यांना बाधा होऊ शकते. म्हणूनच पाण्याची व्यवस्था करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे पाहुयात...
कोंबड्याचे पिण्याचे पाणी
- पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते.
- कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर निरनिराळ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरिन किंवा ब्लिचिंग पावडर यांसारखी जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
- पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून आतून व बाहेरून रेड ऑक्साइड लावावे.
- टाकी सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून अधूनमधून चुना लावावा.
- पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असू नये.
- अन्यथा पावसाचे पाणी टाकीत जाऊ शकते, त्यापासून कोंबड्यांना बाधा होऊ शकते.
Goat farming : जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी