Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Methane Gas : शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो? 

Methane Gas : शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो? 

Latest News How much methane gas does goat release in year effect on temperature | Methane Gas : शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो? 

Methane Gas : शेळी वर्षभरात किती मिथेन गॅस बाहेर सोडते? त्याचा काय परिणाम होतो? 

Methane Gas : गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांसारखे रवंथ करणारे प्राणी देखील मिथेन वायू सोडतात.

Methane Gas : गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांसारखे रवंथ करणारे प्राणी देखील मिथेन वायू सोडतात.

शेअर :

Join us
Join usNext

Methane Gas :  जागतिक तापमानवाढीसाठी मिथेन वायू (Methane Gas) देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार मानला जातो. यात गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांसारखे (goat farming) रवंथ करणारे प्राणी देखील मिथेन वायू सोडतात. मिथेन वायू सोडण्याच्या बाबतीत शेळी तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे, मथुरा येथील केंद्रीय शेळी संशोधन संस्थेत (CIRG) मिथेन नियंत्रित करण्यासाठी सतत संशोधन सुरू आहे. 

शेळ्या एका वर्षात ५ किलो वायू सोडतात
सीआयआरजीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कुमार यांच्या मते, मिथेन वायू सोडण्याच्या बाबतीत म्हशी आणि गायी पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या बाबतीत शेळी तिसऱ्या स्थानावर आहे. अर्थात, गायी आणि म्हशींपेक्षा शेळ्या कमी मिथेन वायू सोडतात, परंतु गायी आणि म्हशींच्या तुलनेत शेळ्यांची संख्या जास्त आहे.

त्यामुळे, शेळ्यांशी संबंधित संशोधन देखील अधिक आणि जलद गतीने केले जात आहे. एका विशेष प्रकारच्या उपकरणाच्या मदतीने शेळीतून उत्सर्जित होणारा मिथेन वायू गोळा करून त्यावर संशोधन सुरु आहे. यासाठी विशेष प्रकारचा हिरवा चारा आणि गोळ्यांचा खाद्य तयार केले जात आहे. यात यशही मिळत आहे. शेळ्यांमधून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी CIRG इतर क्षेत्रात सतत काम करत आहे.

हिरवा तयार करण्याचे संशोधन 
हे संशोधन करत असताना अनेक गोष्टी लक्षात घेऊन शेळ्यांसाठी हिरवा चारा तयार केला जात आहे. सीआयआरजीमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांना सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने चारा वाढवण्याबद्दल देखील सांगितले जात आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांना सेंद्रिय आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या चाऱ्यासाठी खत कसे तयार करावे, याची माहिती देखील दिली जाते. याशिवाय, हिरव्या चाऱ्याचा वापर करून सायलेज आणि गोळ्या बनवण्याबद्दल देखील माहिती दिली जाते.
 

Web Title: Latest News How much methane gas does goat release in year effect on temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.