Goat Farming Disease : नीलजिव्हा (NeelJivha) हा शेळ्या-मेंढ्यांना होणारा एक रोग आहे. या रोगाला 'ब्ल्यू टंग' (Blue Tongue) असेही म्हणतात. या रोगामुळे शेळ्या-मेंढ्यांची जीभ सुजून काळी-निळी पडते. या विषाणूजन्य रोगाची (Goat Farming Desease) लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत, हे जाणून घेऊयात....
नीलजिव्हा आजार कशामुळे?
- हा रोग ऑरबीव्हायरस या विषाणुमुळे होणारा असंसर्गजन्य रोग आहे.
- क्युलीकॉईडस या रक्त पिणाऱ्या डासांच्या माध्यमांतुन प्रसार
- या डासांच्या लाळ ग्रंथींमुळे हे विषाणु वाढतात आणि रोग प्रसार होतो.
- हा रोग प्रामुख्याने डासांची संख्या वाढल्याने साधारणतः पावसाळ्याच्या शेवटी व हिवाळ्याच्या सुरुवातीस होतो.
लक्षणे :
- रोगाच्या तीव्र स्वरुपात १०४ ते १०६ F इतका ताप ५ ते ७ दिवस असतो.
- बाधित शेळ्या-मेंढ्यांच्या नाकातुन स्राव येतो. डोळ्यातून पाणी येते आणि तोंडातुन लाळ गळते.
- जीभ सुजून काळी निळी पडते, म्हणुनच या आजाराला ब्लूटंग किंवा नीलजिव्हा असे संबोधले जाते.
- जनावरांनाचे तोंड व दाढ सुजते तसेच खुरांवर सूज येते व कधी कधी खुरे वेगळी होतात आणि जनावरे लंगडतात.
- गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो.
उपचार :
- हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे यावर विशिष्ट उपचार नाही.
- पशुवैदयकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत जेणेकरून दुयय्म जिवाणुजन्य संसर्ग उद्भवणार नाही.
- तोंडावर व पायावर झालेल्या जखमा निर्जंतुक पाण्याने धुऊन टाकाव्यात व त्यावर मलम लावावे.
प्रतिबंधात्मक उपाय :
- हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे त्यावरील उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा आहे.
- शेळ्यांना डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात चरावयास पाठवू नये.
- साठलेल्या पाण्याची डबकी मुरूम टाकुन बुजवून घ्यावीत.
- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक