Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Dairy Farming Crisis : दुग्धव्यवसायावर अतिवृष्टीने 'पाणी'; चारा टंचाई, दूध संकलनात ३०% घट वाचा सविस्तर

Dairy Farming Crisis : दुग्धव्यवसायावर अतिवृष्टीने 'पाणी'; चारा टंचाई, दूध संकलनात ३०% घट वाचा सविस्तर

latest news Dairy Farming Crisis: Heavy rains 'water' on dairy farming; Fodder shortage, 30% drop in milk collection Read in detail | Dairy Farming Crisis : दुग्धव्यवसायावर अतिवृष्टीने 'पाणी'; चारा टंचाई, दूध संकलनात ३०% घट वाचा सविस्तर

Dairy Farming Crisis : दुग्धव्यवसायावर अतिवृष्टीने 'पाणी'; चारा टंचाई, दूध संकलनात ३०% घट वाचा सविस्तर

Dairy Farming Crisis : गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. चाऱ्याची टंचाई, जनावरांचे आरोग्य बिघडणे आणि दूध उत्पादनात झालेली घट यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. (Dairy Farming Crisis)

Dairy Farming Crisis : गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. चाऱ्याची टंचाई, जनावरांचे आरोग्य बिघडणे आणि दूध उत्पादनात झालेली घट यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. (Dairy Farming Crisis)

संतोष वीर 

भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसोबतच दुग्धव्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या या व्यवसायावर 'पाणी' फिरले असून, चाऱ्याची टंचाई आणि जनावरांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे दूध संकलनात तब्बल २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. (Dairy Farming Crisis)

पशुधन विभागाने चाऱ्याची ३८ हजार टनांची मागणी केली असली तरी, ती वेळेवर मिळेल का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. (Dairy Farming Crisis)

जनावरांसाठी गंभीर परिस्थिती

पशुधन गणनेनुसार तालुक्यात गाईंची संख्या ६१ हजार ५२५, म्हशींची ९ हजार ९०० तर शेळ्यांची ३२ हजार ५९३ एवढी आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. 

मात्र, मुसळधार पावसामुळे जनावरांचा साठवलेला चारा भिजून वास मारू लागला आहे. काही भागात पूरपाण्याने चारा वाहून गेला असून, जिथे चारा उपलब्ध आहे तिथे पोहोचणेही अवघड झाले आहे. परिणामी जनावरांच्या खुराकाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

दूध उत्पादन घटले

फक्त हिरवा व ओला चारा खाल्ल्याने जनावरांना पचनाच्या तक्रारी, पोटफुगी आणि दूध उत्पादन घटणे या समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक गाय व म्हैस रोज सरासरी १-२ लिटर दूध कमी देत आहे. 

संकलनात घट

स्थानिक दूध संघटनांनाही मोठा फटका बसला आहे. भूम तालुक्यातील दोन केंद्रांवर मागील काही दिवसांत दूध संकलनात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे दैनंदिन उत्पन्न कोसळले आहे.

पशुधन विभागाची मागणी

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पशुधन कार्यालयाने मोठ्या प्रमाणात चाऱ्याची मागणी केली आहे. ८ हजार टन कोरडा चारा, २० हजार टन ओला चारा, १० हजार टन मुरघास आणि ३० हजार किलो पशुखाद्य अशी मागणी नोंदवली गेली आहे. एकूण ३८ हजार टन चाऱ्याची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली असून, तो मिळताच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी संतोष दुधन यांनी दिली.

शेतकऱ्यांची चिंता कायम

चाऱ्याची मागणी नोंदवली असली तरी तो प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार याबाबत अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेच, पण आता दुधाचा जोडधंदाही संकटात सापडला आहे.

पशुधन कार्यालयाच्या वतीने कोरडा चारा ८ हजार टन, ओला चारा २० हजार टन, मुरघास १० हजार टन, पशु खाद्य ३० हजार किलो अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. ते मिळताच तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.- संतोष दुधन, पशुधन विकास अधिकारी, भूम.

दूध संकलन घटले

काही काळ संघ मराठवाड्यात एक नंबर गणला जात होता. परंतु, पावसामुळे १३१ शहरातील दूध जनावरांची स्थिती बिघडल्याने दूध संकलनात घट झाली. केंद्रांवर गेल्या काही दिवसांत दुधाचा पुरवठा २० ते ३० टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. - किरण बागडे, पशुपालक, भूम

हे ही वाचा सविस्तर : Zendu Flower Market : दसऱ्याला मिळाला झेंडू फुलांना सोनेरी भाव; जाणून घ्या कसा मिळाला दर

Web Title : भारी बारिश ने भूम में डेयरी व्यवसाय को 'पानी' कर दिया!

Web Summary : भूम में अत्यधिक बारिश से डेयरी व्यवसाय बुरी तरह प्रभावित हुआ है, जो ग्रामीण अर्थव्यवस्था का एक महत्वपूर्ण हिस्सा है। चारे की कमी और पशु स्वास्थ्य समस्याओं के कारण दूध संग्रह 20-30% तक गिर गया है। पशुपालन विभाग प्रभावित किसानों की मदद के लिए चारा मांग रहा है।

Web Title : Heavy Rains 'Water Down' Dairy Business in Bhum!

Web Summary : Excessive rains in Bhum severely impacted the dairy business, a crucial part of the rural economy. Fodder scarcity and animal health issues have caused milk collection to plummet by 20-30%. The animal husbandry department is seeking fodder to aid affected farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.