lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > पाच वर्षांत रायगड जिल्ह्यात १४ हजार टन मत्स्य उत्पादन घटले

पाच वर्षांत रायगड जिल्ह्यात १४ हजार टन मत्स्य उत्पादन घटले

In five years, 14,000 tonnes of fish production decreased in Raigad district | पाच वर्षांत रायगड जिल्ह्यात १४ हजार टन मत्स्य उत्पादन घटले

पाच वर्षांत रायगड जिल्ह्यात १४ हजार टन मत्स्य उत्पादन घटले

खोल समुद्रात व खाडीलगत अशी मासेमारी प्रचलित आहे. मात्र, सध्या खाडीपात्रात जे मच्छीमार मासेमारी करत आहेत, त्यांच्या जाळ्यात मासेच सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्गासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

निखिल म्हात्रे
खोल समुद्रात व खाडीलगत अशी मासेमारी प्रचलित आहे. मात्र, सध्या खाडीपात्रात जे मच्छीमार मासेमारी करत आहेत, त्यांच्या जाळ्यात मासेच सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्गासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मत्स्य विभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, सहा वर्षांत रायगड विभागात १४ हजार टनाने मत्स्य उत्पादन घटले आहे. ही धोक्याची घंटा आहे. २०१७-१८ मध्ये ५३ हजार ३३८ टन मत्स्य उत्पादन होते. २०२२-२३ मध्ये ते ४० हजार ६०१ टनांवर आले आहे तर ४८ मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. हा परिणाम खाडीपात्रात होत असलेल्या प्रदूषणाचा असल्याचे सांगितले जात आहे. मासेमारी हा जिल्ह्याचा एकेकाळी प्रमुख व्यवसाय होता, या व्यवसायावर वाढते प्रदूषण, नियमबाह्य मासेमारी याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

मत्स उत्पादनात घट का?
- राजपुरी, रेवदंडा, धरमतर, करंजा खाडीतील मत्स्य उत्पादनात मोठी घट झाली आहे. राजपुरी खाडीतील दिघी-आगरदंडा बंदर, रेवदंडा खाडीतील कोळशाची वाहतूक, धरमतर खाडीतील गंधक, कोळसा यासारख्या खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
- या खाड्यांमध्ये रायगडमधील सर्व रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी सोडले जाते.

सनरायगडमधील मत्स्य उत्पादन (टना मध्ये)
२०१७-१८५३,३३८
२०१८-१९५८,८४७
२०१९-२०४१,७९७
२०२०-२१३८,०१९
२०२१-२२४०,६०१
२०२२-२३४०,०००

माशांनी अंडी घालायची कुठे?
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात असलेली कांदळवने प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. याठिकाणी वाहून आलेला कचरा, चिखलावर तरंगणारे तेलतवंग, कारखान्यांमधून सोडलेले रासायनिक सांडपाणी यामुळे माशांची अंडी घालण्याची ठिकाणेच नष्ट होत आहेत.

आता सापडत नाही
पेण तालुक्यात पूर्वी जिताडा मासा विपुल प्रमाणात सापडत असे तो आता सापडत नाही तर चिंबोरी, कालवे, मुठे ही मासळीही कमी झाली आहे.

Web Title: In five years, 14,000 tonnes of fish production decreased in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.