lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल?

Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल?

If doing freshwater fish farming, what kind of fish varieties will you bring? | Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल?

Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल?

Fresh Water Fishery गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या जातीचे ओळख आणि जातीनिहाय वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत.

Fresh Water Fishery गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या जातीचे ओळख आणि जातीनिहाय वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत.

शेअर :

Join us
Join usNext

गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या पाण्याचा तळ धरून वाढतात. या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत. त्यामुळे या जातींचे मासे एकाच पाणीसाठ्यात वाढवू शकतो. ह्या जाती प्रमुख्याने शेततळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. या जातींची ओळख आणि जातीनिहाय वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत.

भारतीय प्रमुख कार्प माशांची ओळख

कटला (Catla catla)
१) कटला माशाचे डोके मोठे व रुंद असते.
२) शरीराचा मध्य भाग रुंद व फुगीर असतो. तोंड वरच्या बाजूला वळलेले असते.
३) खालचा भाग जाड असतो. मिशा नसतात.
४) पाण्याच्या वरच्या स्तरात वास्तव्य व फक्त तेथील अन्न खातो. त्यामुळे इतरांच्या अन्नाशी स्पर्धा करीत नाहीत.
५) मिश्रशेतीसाठी उपयुक्त. प्रमुख खादय प्राणी प्लवंग व वनस्पती प्लवंग आहेत.
६) सर्वात जास्त वेगाने वाढणारा कार्प मासा. तिसऱ्या वर्षात प्रजननक्षम होतो.
७) जलद वाढीने व आकर्षक दिसण्यात बाजारात चांगली किंमत शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी अतिशय उपयुक्त मासा.

रोहू (Labeo rohita)
१) शरीर लांब व प्रमाणबद्ध असते.
२) खालचा ओढ जाड असतो. त्याची किनार मऊ व दातेरी असते. वरच्या जबड्यात दोन लहान मिशा असतात.
३) तोंड किंचीत खालच्या बाजूला वळलेले असते. खवले लाल रंगाचे असतात.
४) वास्तव्य पाण्याच्या मध्यस्तरात व तेथीलच अन्न खातो.
५) वाढ वार्षिक ७०० ते ८०० ग्रॅम, मिश्र शेतीसाठी उपयुक्त.
६) आहारात वनस्पती प्लवंग व सडलेलया वनस्पतीवरील जीवजंतू.
७) दुसऱ्या वर्षात प्रजननक्षम होतो. बंगाली लोकांचा आवडता मासा.
८) शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी अतिशय उपयुक्त मासा.

मृगळ (Cirrhinus mrigala)
माशांचे शरीर जास्त लांबट असते.
तोंड स्वतःच्या बाजूला वळलेले रुंद असते.
ओठ पातळ व खालच्या जबडयावर दोन मिशा असतात.
वास्तव्य तलावाच्या तळाजवळ असते. व तळयातील कुजणारे वनस्पतीजन्य
अन्न, शेवाळ व प्राणी प्लवंग
वार्षीक वाढ ६०० ते ७५० ग्रॅम मिश्र शेतीसाठी उपयुक्त दुस-या वर्षी प्रजननक्षम होतो.
शेततळयात गाळ/माती कमी असलयास अपेक्षेत वाढ मिळत नाही..

चायनिज कार्प माशांची ओळख

सिप्रिनस मासा (Cyprinus carpio)
१) सिप्रिनस मासा शरीराच्या घेरापेक्षा किंचीत लांब असतो.
२) जगात सर्वत्र आढळतो. तीन पोटजाती, स्केल कार्प-मिरर कार्प लेदर कार्प.
३) या माशाचे काळपट हिरवट, पिवळा, सोनेरी व लालसर असे नाना रंग असतात.
४) वास्तव्य तळापाशी असते. खुप वेळा तळात रुतून बसतो. हा मासा सर्व भक्षक आहे.
५) वाढ वर्षभरात १२०० ते १५०० ग्रॅम होते. पहिल्या वर्षअखेरीत प्रजननक्षम होतो. व वर्षातून दोनदा पावसाळ्यात व हिवाळ्यात प्रजनन होते. अंडी वनस्पतीना चिकटणारी असतात.
६) मिश्र शेतीला उपयुक्त. बाजारात चांगली किंमत मिळते व सर्व लोकांचा आवडता मासा.
७) खालच्या व वरच्या जबडयात मिळून चार मिशा असतात.
८) शेवाळ व बारीक गवत खातो. म्हणून मत्स्यशेतीसाठी उपयुक्त.

गवत्या मासा/ग्रासकार्प (Ctenopharyngodon idella)
१) शरीर लांबट व बहुतेक मृगळसारखे असते. तोंड निमुळते व अरुंद असते.
२) शेपटाचा पर अतिशय दुभंगलेला असतो. मिशा नसतात.
३) हा मासा अतिशय खादाड आहे. पाण्यातील पान वनस्पती व गवत खातो. म्हणून गवत्या मासा म्हणतात.
४) पाण्यातील मधलया भागात वास्तव्य.
५) वर्षात १०० ते १५०० ग्रॅम वाढ, मिश्र शेतीसाठी उपयुक्त.
६) वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर प्रजननक्षम होतो. पानवनस्पती असतील तर याचा अवय वापर करावा.
७) शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी हा मासा उपयुक्त नाही.

चंदेरी मासा / सिल्व्हर कार्प (Hypopathalmichthys molitrix)
१) संपूर्ण शरीरावर बारीक चंदेरी खवले असतात. म्हणून यास चंदेरी मासा म्हणतात.
२) याचे डोके निमुळते असते. तर शरीर मध्यभागी चपटे असते.
३) त्याचा खालचा जबडा वरच्या पेक्षा किंचीत लांब असतो.
४) वास्तव्य वरच्या स्थरात कटला समवेत.
५) मुख्य अन्न वनस्पती प्लवंग व शेवाळ.
६) वार्षिक वाढ १०० ग्रॅम ते १५०० ग्रॅम मिश्र शेतीसाठी उपयुक्त.
७) मुळचा चीनचा आता भारतात सर्व भागात आढळतो.
८) वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर प्रजननक्षम शेती मिश्रशेतीसाठी उपयुक्त.
९) शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी हा मासा उपयुक्त नाही.

- शेतकरी प्रथम प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

अधिक वाचा: मत्स्यशेतीत खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी आलं हे नवीन यंत्र

Web Title: If doing freshwater fish farming, what kind of fish varieties will you bring?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.