Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > veterinary clinic: एक फोन करा अन् जनावरांवर घरपोच उपचार मिळवा; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

veterinary clinic: एक फोन करा अन् जनावरांवर घरपोच उपचार मिळवा; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

Veterinary clinic: Make a call and get home treatment for animals; initiative of the Animal Husbandry Department | veterinary clinic: एक फोन करा अन् जनावरांवर घरपोच उपचार मिळवा; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

veterinary clinic: एक फोन करा अन् जनावरांवर घरपोच उपचार मिळवा; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

veterinary clinic : गंभीर व अतिगंभीर आजारी जनावरांवर फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाद्वारे (Treatment for Animals) घरपोच उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (Mobile Van) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

veterinary clinic : गंभीर व अतिगंभीर आजारी जनावरांवर फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाद्वारे (Treatment for Animals) घरपोच उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (Mobile Van) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

veterinary clinic :  गंभीर व अतिगंभीर आजारी जनावरांवर फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाद्वारे (Treatment for Animals) घरपोच उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांसाठी अत्याधुनिक प्रत्येकी एक मोबाईल व्हॅन (Mobile Van) उपलब्ध करून देण्यात आली आहे. (veterinarian)

या व्हॅनचे लोकार्पण बनकिन्होळा येथे शुक्रवारी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. बनकिन्होळा येथे शुक्रवारी पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संकरित व देशी जनावरांच्या तालुकास्तरीय पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर फिरत्या चिकित्सालयांतर्गत पशुवैद्यकीय (Treatment for Animals) मिळालेल्या मोबाईल व्हॅनचे (Mobile Van) लोकार्पणही आ. सत्तार यांच्या हस्ते झाले.

या व्हॅनच्या माध्यमातून गंभीर व अतिगंभीर जनावरांवर घरपोच उपचार केले जाणार आहेत. यासाठी सिल्लोड तालुक्यातील पशुपालकांनी १९६२ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

२७ पशुपालकांना बक्षीस वाटप
 
* या प्रदर्शनात विविध ठिकाणच्या जवळपास ३०० पशुपालकांनी सहभाग घेतला. विविध जातीच्या जनावरांचे एकूण ९ गट तयार करण्यात आले होते.
* यातील प्रत्येक गटात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. त्या अनुषंगाने एकूण २७ पशुपालकांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यासाठी ६ मोबाइल व्हॅन

गंभीर व अतिगंभीर आजारी जनावरांवर घरपोच उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, पैठण, वैजापूर आणि सोयगाव या सहा तालुक्यांसाठी प्रत्येकी एक मोबाईल व्हॅन मिळाली आहे. या मोबाईल व्हॅनद्वारे उपचारासाठी पशुपालकांसाठी १९६२ टोल फ्री नंबर देण्यात आला आहे.

पशुवैद्याची मदत

या मोबाईलच्या माध्यमातून जनावरांना आजार झाल्यास, लगेच टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. (veterinarian) आता पशुंवर लवकर उपचार करण्यासाठी पशुवैद्याची मदत मिळणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव तायडे, जि. प.चे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना तालुकाप्रमुख मारोती वराडे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. किसन चामरगोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय फुन्से, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, डॉ. बी. बी. गायकवाड, सरपंच पद्माबाई फरकाडे, उपसरपंच पुजा खरात, सोनू जैस्वाल, चेअरमन कचरू फरकाडे, रावसाहेब फरकाडे, प्रल्हाद फरकाडे, अब्दुल चाऊस आदींची उपस्थिती होती.

हे ही वाचा सविस्तर : CIBIL Score : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सिबील स्कोअर किती? 'या' कारणामुळे प्रकल्प अर्ध्यावर वाचा सविस्तर

Web Title: Veterinary clinic: Make a call and get home treatment for animals; initiative of the Animal Husbandry Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.