Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेंढीपालनात मटणासाठी विशेष लोकप्रिय जात म्हणून 'ह्या' मेंढीचे महाराष्ट्रात मोठं नाव लौकिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:19 IST

मेंढपाळांच्या मते मडग्याळ मेंढीची उत्पत्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ व सनमाडी गावात स्थानिक मेंढीपालकांनी निवड पैदास पद्धतीने केली आहे.

मेंढपाळांच्या मते मडग्याळ मेंढीची उत्पत्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ व सनमाडी गावात स्थानिक मेंढीपालकांनी निवड पैदास पद्धतीने केली आहे.

madgyal mendhi मडग्याळ मेंढ्या झपाट्याने वजन वाढवण्याची क्षमता दर्शवतात. माडग्याळ ही महाराष्ट्रातील मोठ्या आकाराची व मटणासाठी विशेष लोकप्रिय मेंढी आहे.

प्रामुख्याने पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके आढळतात तर काही मेंढ्या तपकिरीदेखील दिसतात. महाराष्ट्रातीलसांगली जिल्ह्याने आज पशुपालनात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील 'माडग्याळ' मेंढी आज मेंढीपालकांसाठी प्रगतीचा मार्ग ठरत आहे. धिप्पाड शरीर व आकर्षक रोमन पद्धतीचा बाक असलेल्या नाकामुळे या जातीने देशभरातील पशुपालकांचे लक्ष वेधले आहे.

शारीरिक वैशिष्ट्ये◼️ पोपटी नाक हे या जातीचे मुख्य ओळखचिन्ह असून, यामुळे मेंढ्यांना अधिक दर मिळतो.◼️ शेपटी मध्यम व पातळ असून लोकर अत्यंत खडबडीत, केसाळ व उघडी असते.◼️ रुंद व फुगीर कपाळ ही यांची ओळख आहे.◼️ पाय लांब, मजबूत व राखाडी खुरांसह पातळ असतात.◼️ पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके त्यांचे सौंदर्य वाढवतात.

वजन वाढ व उत्पादन◼️ मांसाहारासाठी मडग्याळ जात सर्वोत्तम आहे◼️ जन्मावेळी कोकराचे वजन साधारण ३.५ ते ४.५ किलो.◼️ उत्तम आहारात वर्षभरात २० ते ३५ किलोपर्यंत पोहोचते.◼️ पूर्ण वाढलेल्या नराचे वजन ४० ते ५० किलोपर्यंत असू शकते.◼️ वयस्क मडग्याळ नर साधारणतः ५५ ते ६० किलो तर मादी ४० ते ४५ किलो वजनाची आढळते.

अर्थकारण१० माद्या व १ नर यापासून सुरुवात केल्यास◼️ विक्री : नर कोकरे सणांच्या वेळी २०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत विकली जातात.◼️ पैदास : माडग्याळ मेंढी २ वर्षांतून ३ वेळा वेत देते.◼️ खत : लेंडीखताच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते.◼️ गोठा : कोरडा व हवेशीर असावा. एका मेंढीला १०-१२ चौरस फूट जागा लागते. जमीन लाकडी फळ्यांची असल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

- जिल्हा उपआयुक्तपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, सांगली

अधिक वाचा: भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक पदांचा निकाल जाहीर; इथे पहा विभागनिहाय नावांची यादी

English
हिंदी सारांश
Web Title : Madgyal Sheep: Maharashtra's Popular Meat Breed with Promising Economic Returns

Web Summary : Madgyal sheep, originating in Sangli, Maharashtra, are known for rapid weight gain and high-quality meat. Distinguished by their unique nose and adaptability, they offer breeders significant income through meat sales, breeding, and fertilizer production. A mature male can weigh 50-60 kg.
टॅग्स :शेतीदुग्धव्यवसायशेळीपालनसांगलीमहाराष्ट्र