योगेश गुंडशेतीकामात वाढते यांत्रिकीकरण, वाढती महागाई आणि सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणे अलीकडच्या काळात आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले आहे.
मात्र, केडगाव सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष अंजाचापू सातपुते व दूध व्यावसायिक संतोष रंगनाथ कोतकर यांच्या कुटुंबाला तीन पिढ्यांपासून बैलांचा लळा आहे.
प्रत्येक पोळ्याला तीन ते चार लाखांची नवीन बैलजोडी घेऊन त्यांना कुटुंबाप्रमाणे ते जीव लावतात, केडगाव येथील अंजाबापू सातपुते व संतोष रंगनाथ कोतकर या शेतकरी कुटुंबाला बैलांचा विशेष लळा आहे.
तीन पिढ्यांपासून हे कुटुंब बैलांची सेवा करते, त्यांना घरच्यांसारखा जीव लावतात यंदाही सातपुते यांनी आवड म्हणून ३ लाख २१ हजारांची बैलजोडी घेतली आहे.
ही बैलजोडी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथांच्या दिहीत होती. यंदा केडगाव दिंडींचा रथ ओढण्याचा मान या बैलजोडीला होता.
तसेच, केडगात येथील दुग्ध व्यावसायिक संतोष रंगनाथ कोतकर यांचे कुटुंबही दरवर्षी खास पोळ्याला लाखोंची नवी बैलजोडी आणतात. दोन्ही कुटुंबांकडून पोळ्याला लाडक्या सर्जा-राजाची लक्षवेधी मिरवणूक काढली जाते.
असा होतो बैलांचा साज-श्रृंगारपोळ्याला बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या अन् घुंगरांच्या माळा, नयी वेसण, नवा कासरा, पायात चांदी वा करदोड्याचे तोडे घालतात. सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. सजवलेल्या बैलाची मिरवणूक काढली जाते.
व्हीआयपी बडदास्तसर्जा-राजाची बडदास्त ठेवण्याची कोणतीच कसर सातपुते व कोतकर परिवार ठेवत नाही. दर दोन दिवसांनी त्यांना अंघोळ घातली जाते. बैलांसाठी गोठ्यात फॅन बसवले आहेत. बसण्यासाठी मॅट आहेत. रोज सकाळी एक तास त्यांच्याकडून शारीरिक कसरतीही करून घेतल्या जातात.
५० हजारांचा खर्चबैलजोडीला दिवसभरात ३२ किलो पेंड, सकाळी गावरान तुपात मळलेल्या गव्हाच्या पिठाचे गोळे करून खाऊ घालतात. दर १७ दिवसांनी २५० ग्रॅम मोहरीचे तेल त्यांना पाजण्यात येते. महिन्याला ५० हजार रुपयांचा खर्च सर्जा-राजावरील प्रेमापोटी ते करतात
महागाईच्या काळात बैलजोडी सांभाळणे परवडत नाही. मात्र, आमच्या कुटुंबाला वडिलोपार्जित बैलांची हौस आहे. बैलांवरील प्रेमापोटी हा खर्च करतो. सर्वजण वर्षभर त्यांची काळजी घेतात. त्यांना जीव लावला की त्यांचाही आपल्यावर जीव राहतो. आमच्या घरात जुन्या काळापासून बैलांवर माया करण्याची परंपरा आहे. आम्ही ती पुढे चालवत आहोत. - अंजाबापू सातपुते, प्रगतिशील शेतकरी, केडगाव
अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर