Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा

Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा

Sheli Palan: Are you thinking of raising goats? Then definitely read this | Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा

Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा

Goat Farming : शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात.

Goat Farming : शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात.

शेअर :

Join us
Join usNext

शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबरशेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात.

शेळीपालन शेतीपूरक आर्थिक उन्नतीचा मार्ग देणारा व्यवसाय आहे. मात्र यात आधुनिक व सुधारित तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेळीपालन व्यवसाय फारसा यशस्वी ठरत नाही.

आपला देश हा कृषिप्रधान असून शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी व मेढीपालनास विशेष महत्त्व आहे. मर्यादित स्वरूपातील या व्यवसायाकडे अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील पाहिले जाऊ लागले आहे.

कमी खर्च व कमी कष्ट यातून जास्त उत्पन्न मिळत असल्याने या व्यवसायाकडे अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी व महिलांचा कल अधिक वाढला आहे. 

शेळीपालन व्यवसायाचे चोख नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानास मेहनत व चिकाटीची जोड दिल्यास शेळीपालनातून किफायतशीर उत्पादन मिळून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. राज्यात मांसाची मागणी व उत्पादकता यात मोठी तफावत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे अधिक दर्जेदारपणे शेळ्यांचे संगोपन करून जास्तीत जास्त उत्पादन स्तर या व्यवसायातून वाढवणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

✦ शेळीपालन व्यवसाय का करावा? 

• शेळीपालन व्यवसाय कमी गुंतवणूकीत कोणत्याही व्यक्तीस अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो.
• शेळीपालन व्यवसाय शेतीपूरक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
• शेळीपालनातून दुधाचे उत्पादन होते.
• शेळीपालतून उत्तम दर्जाचे मांस उत्पादन मिळते.
• बहुतांशी लोकांच्या आहारात बकरीच्या मांसाचा उपयोग केला जातो.
• शेळीपालनातून चांगल्या प्रकारचे लेंडीखत शेतीचा कस सुधारण्यासाठी उपयोग होतो.
• मांस विकल्यानंतर उर्वरित कातडीला सुद्धा चांगला दर मिळतो.
• बकरीच्या कातडीपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात.
• विविध शासकीय योजनांचा लाभ शेळीपालनासाठी घेता येतो.

✦ शेळीपालन व्यवसायात संधी व वाव 

• शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्पभूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.

• भारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे १२३ दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या आहेत. असे असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांस व ४५ टक्के कातडी प्राप्त होते. भारतात शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त ५८ लिटर इतके आहे. 

• खाद्याचे, शेळ्यांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो.

• बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळ्यांना गोठ्या मध्येच पुरवला जातो.

• अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळ्यांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात, यामुळे शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

✦ शेळीपालन व्यवसायातून होणारे फायदे

• शेळीपालन व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.
• शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देण्याची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे.
• काही जातीच्या शेळ्या या १४ महिन्या मध्ये दोनदा वितात यामुळे अधिक उत्पन्न मिळते.
• पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो.
• शेळी हा प्राणी काटक असतो, त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवून घ्यायची असते.
• शेळ्यांच्या विष्ठेचे उत्तम खत म्हणून उपयोग होतो.
• बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त असून ती दिवसेंदिवस वाढत आहे.
• शेळ्यांचे शिंगापासून व खुरापासून वस्तू बनतात.
• शेळीचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते.

प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय
दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : Crop Management : यंदा टरबूज, खरबूज लागवड करायची आहे ? मग 'हे' तंत्र वापरा आणि उत्पादन वाढवा

Web Title: Sheli Palan: Are you thinking of raising goats? Then definitely read this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.