बापू नवलेपारंपरिक पशुपालनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अल्प संसाधनांतूनही मोठे यश मिळवता येते, हे गलांडवाडी (ता. दौंड) येथील प्रगतिशील पशुपालक संदीप नीळकंठराव शितोळे यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
सिमेन सॉर्टिंग या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध वापर करून त्यांनी उच्च दूध उत्पादक गायींची पैदास केली असून, आज त्यांचा गोठा संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
शिवाजीनगर कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (अॅग्री) पदवी घेतलेल्या संदीप शितोळे यांच्याकडे घरी पारंपरिक पशुपालनाची पार्श्वभूमी होती.
सुरुवातीला अवघ्या सहा गायींपासून सुरू केलेला हा प्रठास आज ५० पेक्षा अधिक सिमेन सॉर्टेड कालवडींपर्यंत पोहोचला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाची निवड करतानाच त्यांनी सुरुवातीपासुनच वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला.
सामान्यतः एक गाय दिवसाला १० ते १५ लिटर दूध देते, मात्र शितोळे यांच्या गोठ्यातील गायी या मापदंडांपेक्षा कितीतरी पुढे आहेत. त्यांच्या गायी किमान ३५ ते ३८ लिटरपर्यंत दूध देत आहेत.
सध्या केवळ दहा दुभत्या गायींमधून दररोज सुमारे ४५० लिटर दूध विक्री होत आहे. सातत्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादनामुळे दूध संकलन केंद्रांकडून त्यांना चांगला दरही मिळतो.
दूध उत्पादनासोश्चतच गायींच्या आरोग्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. संतुलित व पौष्टिक आहार, स्वच्छ व मुक्त गोठा, वेळेतर लसीकरण आणि नियमित वैद्यकीय तपासणी यामुळे गायी निरोगी राहतात.
या सर्व व्यवस्थापनासाठी डॉ. डी. एच. ठुबे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत असून, त्यांच्या सल्ल्यानुसारच पशुपालनातील निर्णय घेतले जातात. या कामात वडील नीळकंठ, आई निर्मला, पत्नी ज्योती आणि मुलगा ओंकार शितोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभते.
सकारात्मक दृष्टीने पाहावे◼️ नुकतीच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शितोळे यांच्या गोठबाला भेट देत त्यांच्या प्रयोगाचे कौतुक केले.◼️ आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती कशी करता येते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी शेती व पशुपालनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहाये, असे आवाहनही त्यांनी केले.◼️ कमी संख्येतील गायी, उच्च उत्पादन, शास्त्रीय व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधल्यास पशुपालन हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे संदीप शितोळे यांनी दाखवून दिले आहे.◼️ त्यांचा हा यशस्वी प्रयोग आज परिसरातील अनेक शेतकरी व पशुपालकांना प्रेरणा देत असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी तो निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे.
काय आहे सिमेन सॉटिंग तंत्रज्ञान?◼️ उच्च दूध देणाऱ्या गायीच्या वळूच्या वीर्य लिंग निदान करून (फक्त्त कालवडी होण्याची खात्री असलेले वीर्य) कृतिम रेतन केले जाते.◼️ त्यामुळे उच्च दूध देणाऱ्या कालवडींचीच पैदास होते. या तंत्रज्ञानास केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची मान्यता आहे.
गलांडवाडी येथे शेतकऱ्यांची दूध क्रांती◼️ येथील बहुतांशी गोठे मुक्त पद्धतीने केले आहेत. ज्यामध्ये मजुरांची संख्या अजून कमी होते. मुक्त संचार केल्यामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर चारा व पाणी त्यांना हवा तसा ते घेत राहतात.◼️ येथील शेतकरी २०१५ मुरघास बनवन्यावर भर देतात. बारामाही जनावरांना हिरवा चारा व सुका चारा असल्यामुळे दुधामध्ये प्रचंड वाढ होत आहे.◼️ आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब येथील प्रत्येक शेतकरी करतो. येथील शेतकरी लक्ष्मण शेंडगे यांचे देखील २५० लिटर दूध जाते. सॉर्टेड सिमेन द्वारे त्यांच्याकडे देखील उच्च प्रतीच्या दुध देणाऱ्या गाई आहेत.◼️ ज्ञानदेव कदम, सुनील शहाजी कदम, प्रशांत कदम, दत्तात्रेय संपत कदम, दादा बबन शिंदे, विजय कुंजीर, अविनाश जगताप, धुळाजी बोरकर, दत्तात्रय पवार, बबन देवकर या शेतकऱ्यांच्या गाईंचे दूध देखील अव्वल आहे.◼️ हे शेतकरी वेळोवेळी जंत निर्मूलन, साथीच्या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण, गाईंच्या आरोग्याची नेहमी काळजी घेत असतात.◼️ गावातील ४० टक्के शेतकऱ्यांचे गोठे मुक्त संचार पद्धतीने असल्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी आहेत त्याचबरोबर गायींचे दूध उत्पादन देखील उच्च राहते.
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 'हा' कारखाना देणार उसाला सरसकट १०० रुपये अनुदान
Web Summary : Sandeep Shitoḷe's dairy farm in Galandwadi thrives using semen sorting, yielding high-producing cows. With scientific methods and guidance, his farm produces 450 liters of milk daily from ten cows, inspiring local farmers and boosting rural employment through modern techniques.
Web Summary : संदीप शितोळे के डेयरी फार्म ने वीर्य छंटाई तकनीक से उच्च उत्पादन वाली गायें पैदा कीं। वैज्ञानिक तरीकों और मार्गदर्शन से, उनका फार्म दस गायों से प्रतिदिन 450 लीटर दूध का उत्पादन करता है, जो स्थानीय किसानों को प्रेरित करता है और आधुनिक तकनीकों के माध्यम से ग्रामीण रोजगार को बढ़ावा देता है।