Join us

Dudh Anudan : तुमच्या जिल्ह्याने किती दूध अनुदान घेतले? वाचा ५३४ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाची जिल्हानिहाय यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:25 IST

Milk subsidy District Wise: राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला. आतापर्यंत वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यात मिळाले.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला. आतापर्यंत वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यात मिळाले.

शासनाने तरतूद केलेल्या ७५८ कोटींपैकी ११० कोटी ८४ लाख रुपये सप्टेंबर अखेरचे अनुदान देय आहे. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील अनुदान द्यावे लागणार आहे.

गाय दूध खरेदी दर कमी झाल्याने शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचा निर्णय घेतला. ११ मार्च ते ३० जूनपर्यंत दूध अनुदान बंद केले होते.

त्यानंतर १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनुदानात वाढ करून ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी सात रुपये केले.

मिळालेले व देय (कोटीत)

जिल्हावाटपदेय
अहिल्यानगर१५२.१२२७.८७
सोलापूर७५.२११४.५८
सातारा३९.६७४.०५
कोल्हापूर२६.७०९.५४
सांगली२२.३९१८.३०
नाशिक१७.०५६.५२
छ. संभाजीनगर१०.५६५.७३
धाराशिव६.९२४.१७
बीड६.३४३.०९
जळगाव५.०८२.२५

खालील रक्कम लाखांमध्ये

नागपूर७९.०३२६.८०
लातूर३३.८११४.६७
जालना३१.७९२६.२५
धुळे२०.६३४.३३
अमरावती१८.५४११.८५
भंडारा१७.०९६.२३
बुलढाणा१४.८०३.६६
वर्धा५.७३७५०००
परभणी३.९३८००००
नांदेड४६०००शून्य

हेही वाचा : Dairy Farmer Success Story : शेतीला पशुधनाची जोड गरजेची; दूध दर कमी असतांनाही देविदासरावांची आर्थिक प्रगती

टॅग्स :दूधशेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसायमहाराष्ट्र