Best Fodder Crops : जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात वाढीसाठी पौष्टिक हिरवा चारा अत्यंत आवश्यक आहे. मका, ज्वारी, बाजरी (एकदल) आणि लसूणघास, चवळी (द्विदल) यांसारखी पिके उत्तम आहेत.
जनावरांसाठी चाऱ्याची पिके
- जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, मका व बाजरीची फेब्रुवारी मध्ये पेरणी करावी.
- पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी चारा पिकाची लागवड करावी.
- जनावराना सकाळच्या थंडीपासून बचाव व संरक्षण करावे व गोठा कोरडा ठेवावा.
- गोठा कोरडा राहील, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यासाठी दर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा.
- जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड/ सरकी पेंड यांचा वापर वाढवावा.
- शक्य असल्यास बायपास फॅट आणि प्रथिनयुक्त आहार यांचा वापर वाढवावा.
- क्षार व जीवनसत्त्वांचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा.
- चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे, जेणेकरून गवतावर दहिवर नसेल.
- गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत.
- जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
