Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:55 IST

Agriculture News : अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत, जाणून घेऊयात..

Agriculture News : अतिवृष्टीमध्ये जनावरांची काळजी घेण्यासाठी गोठा सुरक्षित करणे, जनावरांना स्वच्छ पाणी देणे, त्यांना योग्य चारा पुरवणे आणि त्यांच्या खुरांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, जनावरांना वेळेवर लस देणे आणि आजारी पडल्यास पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी उपाय : 

गोठा सुरक्षित ठेवा : पूर येण्याची शक्यता असल्यास जनावरांना उंच ठिकाणी सुरक्षितपणे हलवा.गोठ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.ओल्या शेणामुळे जनावरांच्या खुरांना आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवा.जनावरांना ओल्या ठिकाणी बांधणे टाळावे. गोठा नेहमीच हवेशीर ठेवाव.

स्वच्छ पाणी आणि चारा : जनावरांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्या, कारण दूषित पाण्यामुळे आजार होऊ शकतात.पावसाळ्यात पिकांची कोवळी रोपे जनावरांना खाण्यासाठी देऊ नका, कारण ती जनावरांसाठी हानिकारक असू शकतात.जनावरांना सकस आणि पोषक चारा द्या.

जनावरांचे आरोग्य : जनावरांच्या त्वचेला आणि खुरांना होणाऱ्या आजारांपासून संरक्षण द्या.पावसाळ्यात जनावरांना आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांना योग्य वेळी लस द्या.आजारी जनावरांना त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्यांचा सल्ला घ्या.अतिवृष्टी काळात जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना नियमित जंतनाशक औषधे द्यावीत. घटसर्प अणि फऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. बाह्य परोपजीवी (गोचीड, गोमाशी) नियंत्रण ठेवण्यासाठी गोठा स्वच्छ अणि कोरडा ठेवावा.

इतर महत्त्वाच्या गोष्टी : पूरपरिस्थितीत जनावरे दावणीला बांधू नका; त्यांना मोकळं सोडा, कारण जनावरे नैसर्गिकरीत्या पोहू शकतातमृत जनावरांची विल्हेवाट पाण्याच्या स्रोतांपासून आणि सार्वजनिक ठिकाणांपासून दूर लावावी.जनावरांच्या आरोग्यावर आणि आहारावर सतत लक्ष ठेवा.स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा अणि आवश्यक असल्यास स्थानिक पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.

- संदीप नेरकर - विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान व दुग्धशाश्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव 

टॅग्स :पाऊसगायशेती क्षेत्रशेतीसोलापूरपूर