Goat Farming : पावसाळ्यातील शेळी निवारा (Sheli Palan) व्यवस्थापन महत्वाचे आहे. शेळ्यांना पावसापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना कोरडे, हवेशीर आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी निवारा व्यवस्थित बांधणे आवश्यक आहे. आजच्या भागातून शेळी आणि मेंढीचे पावसाळ्यातील व्यवस्थापन कसे करावे, हे पाहुयात...
शेळी गोठा व्यवस्थापन
- पावसाळ्यामध्ये पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो. त्यानुसार शेळ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ती उपाययोजना करावी.
- शेळ्यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी दालने असावीत.
- ज्यामुळे आजारी शेळ्या, पिले, गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील.
- शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा द्यावी. जेणेकरून गर्दी होणार नाही.
- पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा.
- तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरल्यास शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होईल.
मेंढ्यांतील व्यवस्थापन
कोकरे व मेंढ्यांना जुलाब झाल्यास तात्काळ औषध उपचार करावा. सहा महिन्यांचे कोकरांचे वजन घ्यावे. लोकर कातरणी करावी.
प्रती मेंढी ४०० ग्रॅम या प्रमाणात पौष्टिक आहार (पेंड) खाऊ घालावी.
सर्व मेंढ्यांना नीलजिव्हा रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी