Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > क्वालिटी दूध उत्पादनासाठी सुक्या चाऱ्याची निर्मिती अन् साठवणूक कशी करावी, वाचा सविस्तर 

क्वालिटी दूध उत्पादनासाठी सुक्या चाऱ्याची निर्मिती अन् साठवणूक कशी करावी, वाचा सविस्तर 

Latest News Read in detail how to prepare and store dry fodder for quality milk production. | क्वालिटी दूध उत्पादनासाठी सुक्या चाऱ्याची निर्मिती अन् साठवणूक कशी करावी, वाचा सविस्तर 

क्वालिटी दूध उत्पादनासाठी सुक्या चाऱ्याची निर्मिती अन् साठवणूक कशी करावी, वाचा सविस्तर 

Making Dry Fodder : शेतीतील पिकांच्या वाळलेल्या अवशेषांना सुका चारा म्हणून संबोधले जाते व त्याचाच सर्रास वापर केला जातोय.

Making Dry Fodder : शेतीतील पिकांच्या वाळलेल्या अवशेषांना सुका चारा म्हणून संबोधले जाते व त्याचाच सर्रास वापर केला जातोय.

Making Dry Fodder  :  शेतीतील पिकांच्या वाळलेल्या अवशेषांना सुका चारा म्हणून संबोधले जाते व त्याचाच सर्रास वापर केला जातोय, परंतु पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर, त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मूल्ये व हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी, सावलीत वाळवलेला चारा म्हणजे 'सुका चारा' होय.

पावसाळ्यात उपलब्ध अतिरिक्त चारा जो मुरघास करण्यास योग्य नाही, जसे की द्विदल चारा पिके किंवा पिकांचे अवशेष यांचा सुका चारा तयार करण्यासाठी तो कापून दोन ते तीन दिवस शेतातच पातळ थर देऊन सुकू द्यावा. शेतात चारा सुकताना दोन-तीन वेळा वर-खाली करावा. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर असा चारा पातळ थर करून सावलीत जमिनीवर किंवा रॅकवर वाळू घालावा. 

अशाप्रकारे योग्य रीतीने हिरव्या रंगाचा सुका चारा तयार होईल. त्याच्या गासड्या बांधून किंवा पेंढ्या बांधून साठवणूक करता येईल. यात जास्तीत जास्त पोषक घटक असतील, तसेच चारा साठवताना त्याच्या पानांचा हास होणार नाही. 

लसूण घास, बरसीम अशा द्विदल चाऱ्याचा सुका चारा बनविल्यास पचनीय तंतुमय पदार्थांशिवाय जनावरांसाठी तो प्रथिनांचाही एक उत्तम स्रोत ठरेल, त्यामुळे केवळ दुग्धोत्पादन न वाढता दुधातील स्निग्धांश व एस.एन.एफ. मध्येही भरघोस वाढ होते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी 

 

 

Pm Kisan Scheme : पीएम किसानचा पुढचा हफ्ता 'या' तारखेला मिळणार, पण तुम्ही दोन हजार रुपये विसरा!

 

Web Title : गुणवत्तापूर्ण दूध के लिए सूखा चारा कैसे बनाएं और स्टोर करें

Web Summary : फसल अवशेषों और चारे को ठीक से सुखाकर और भंडारित करके पशुधन के लिए पोषक तत्वों से भरपूर सूखा चारा बनाना सीखें। इससे दूध उत्पादन और गुणवत्ता में सुधार होता है।

Web Title : How to Make and Store Dry Fodder for Quality Milk

Web Summary : Learn how to create nutrient-rich dry fodder for livestock by properly drying and storing crop residues and forages. This improves milk production and quality.