Pashudhan Kasdah : कासदाह (Mastitis) हा दुधाळू जनावरांमधील (गायी-म्हशी) सर्वात गंभीर जीवाणूजन्य रोग आहे, ज्यामध्ये कास सुजते आणि दुधाचे उत्पादन व दर्जा खालावतो. लक्षणे काय आहेत आणि काय उपाययोजना कराव्यात, हे पाहुयात...
कासदाह होण्याची कारणे आणि उपाययोजना
- जिवाणू संसर्ग, घाणेरडी जागा, दूध काढण्याच्या अयोग्य पद्धती, आणि जनावरांच्या कासेला होणारी दुखापत.
- लक्षणे : कास सुजणे, गरम लागणे, लाल होणे, आणि वेदना होणे
- रोग प्रतिकारक्षमता कमी असेल तर गाई, म्हशी लवकर आजारी पडतात.
- व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येते.
- सडावाटे हे जीवाणू कासेत प्रवेश करीत असल्यामुळे गोठ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.
- गोठ्याची रचना, स्वच्छता, गाई, म्हशींच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडविणे, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना वापरावा.
- दूध काढणीयंत्राची स्वच्छता राखावी, प्रत्येक गायीचे दूध काढण्याअगोदर हात धुवून घ्यावेत.
- जंतुनाशक द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.
- आहार व्यवस्थापनात प्रथिने आणि ऊर्जा यांचे संतुलन, शरीराची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सेलेनियम, जीवनसत्त्व ई तसेच झिंक आणि बायोटीनचा वापर करावा.
- कासदाह झाल्यानंतर किंवा लक्षणे दिसून आल्यानंतर पशुवैद्यकीय मदत, खराब दुधाची योग्य विल्हेवाट लावावी.
- गोठ्यात नवीन येणाऱ्या गाई, म्हशी जीवाणूंच्या सुप्त वाहक असू शकतात.
- म्हणून नवीन जनावरे पशुवैद्यकाकडून तपासून कुठलाही आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
