Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांचे चराईचे वेळापत्रक बदलणं आवश्यक, अन्यथा लाखोंचं नुकसान होईल!

Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांचे चराईचे वेळापत्रक बदलणं आवश्यक, अन्यथा लाखोंचं नुकसान होईल!

Latest News necessary to change the grazing schedule of goats in summer see details | Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांचे चराईचे वेळापत्रक बदलणं आवश्यक, अन्यथा लाखोंचं नुकसान होईल!

Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांचे चराईचे वेळापत्रक बदलणं आवश्यक, अन्यथा लाखोंचं नुकसान होईल!

Goat Farming : न्हाळ्यात शेळ्यांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी चराईचे वेळापत्रक बदलणे आवश्यक आहे.

Goat Farming : न्हाळ्यात शेळ्यांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी चराईचे वेळापत्रक बदलणे आवश्यक आहे.

Goat Farming :   उन्हाळ्यात शेळ्यांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी चराईचे वेळापत्रक बदलणे (सकाळी लवकर/संध्याकाळी उशिरा), सकस चारा व भरपूर स्वच्छ पाणी देणे, आणि सावलीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दररोज २-३ तास चराई करून साखर-मीठ-हळद मिश्रित पाणी पाजल्यास शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. 

शेळी - उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन 

  • महाराष्ट्रात सर्वसाधारणतः शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात.
  • त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान ८ ते ९ किलोमीटर चालावे लागते. 
  • उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ प्रतीचा चारा शिल्लक असतो. 
  • अश्यावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही. 
  • तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना कारावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते. 
  • तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. 
  • काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो. 
  • म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

 

उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन : 
शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर (५ ते ९ दरम्यान) आणि सायंकाळी उशिरा (५ ते ८ दरम्यान) चराईसाठी सोडावे. 
शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी १२ ते ४ या वेळेत दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : बकरी पालन: नुकसान से बचने के लिए गर्मियों में चराई का समय बदलें!

Web Summary : गर्मियों में बकरियों को गर्मी से बचाने के लिए चराई का समय बदलें, पौष्टिक चारा, पर्याप्त पानी और छाया प्रदान करें। स्वास्थ्य के लिए चीनी-नमक-हल्दी पानी दें।

Web Title : Goat Farming: Adjust grazing schedule in summer to avoid losses!

Web Summary : Protect goats from summer heat by adjusting grazing times, providing nutritious fodder, ample water, and shade. Supplement with sugar-salt-turmeric water for health.