Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Lumpy Disease : नाशिक जिल्हा परिषदेकडून लंपी नियंत्रणासाठी जलद कृती दल, वाचा सविस्तर 

Lumpy Disease : नाशिक जिल्हा परिषदेकडून लंपी नियंत्रणासाठी जलद कृती दल, वाचा सविस्तर 

Latest news Lumpy Disease Nashik Zilla Parishad takes measures for lumpy control, read in detail | Lumpy Disease : नाशिक जिल्हा परिषदेकडून लंपी नियंत्रणासाठी जलद कृती दल, वाचा सविस्तर 

Lumpy Disease : नाशिक जिल्हा परिषदेकडून लंपी नियंत्रणासाठी जलद कृती दल, वाचा सविस्तर 

Lumpy Disease : जनावरांमध्ये लंपीची लक्षणे निदर्शनास आल्यास जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. 

Lumpy Disease : जनावरांमध्ये लंपीची लक्षणे निदर्शनास आल्यास जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील काही गोवर्गीय जनावरांमध्ये लंपी चर्मरोगासारखी लक्षणे निदर्शनास आल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या निर्देशान्वये जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत, यामध्ये जलद कृती दलाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुरगाणा तालुक्यात ३ जलद कृती दल टीम तयार करण्यात आल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्या सुचनेनुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रशांत धर्माधिकारी व जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रकाश आहेर (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, नाशिक) यांनी सुरगाणा तालुक्यातील रगतविहीर गावास भेट देऊन फणसपाडा येथील नागरिकांच्या गोठ्यांतील बाधित जनावरांची तपासणी केली. त्याचबरोबर संबंधित जनावरांचे नमुने संकलित करून ते पुणे येथील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्रतीक्षेत आहे. 

याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबण्यात येत असून जलद प्रतिसाद दल, लसींचा पुरवठा, बाधित जनावरांवर उपचार, लसीकरण न झालेल्या जनवारांचे लसीकरण या बाबींवर कार्यवाही करण्यात येत आहे सध्या सुरगाणा तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

पशुपालकांनी कोणताही संभ्रम अथवा भीती न बाळगता आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी तात्काळ संपर्क साधावा, जनावरांमध्ये लंपी चर्मरोगासारखी लक्षणे आढळल्यास विलंब न करता माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी दिली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी देणार भेट
सुरगाणा तालुका हा केंद्र शासनाच्या वतीने आकांक्षित तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे, त्यानुषंगाने सुरगाणा तालुक्यातील विकास कामे, वैद्यकीय सुविधा, पशू वैद्यकीय सुविधा व पंचायत समितीचे कामकाज याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे लवकरच आढावा घेणार आहेत.

राबविण्यात आलेल्या उपाययोजना : 

जलद कृती दल स्थापन
तालुक्यातील सर्व पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन जलद कृती दल (Rapid Action Teams) स्थापन करण्यात आले आहेत. या पथकांद्वारे गावोगावी भेट देऊन तपासणी, उपचार व लसीकरणाची कार्यवाही करण्यात येत आहे.

लसींचा पुरवठा
सुरगाणा तालुक्यासाठी आपत्कालीन स्वरूपात २ हजार डोस लसींचा तात्काळ पुरवठा करण्यात आला आहे. पुढील मागणीप्रमाणे अतिरिक्त लसी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
उपचाराची कार्यवाही
बाधित नऊ जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून आवश्यक औषधोपचार व पोषक आहाराची सोय करून दिली आहे.

लसीकरण मोहीम
अद्याप लसीकरण न झालेल्या २८९ गायीवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. दूध संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक यांच्या सहकार्याने लसीकरण आणि कीटकनाशक फवारणीची मोहीम गतीने सुरू असून गुरुवारपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पूर्वलसीकरणाचा लाभ
यापूर्वी तालुक्यात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत एकूण २१ हजार ५८० जनावरांना गोअट पॉक्स (लंपी) लसीकरण देण्यात आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे सुरक्षित आहेत.

औषध व साहित्य उपलब्धता
जिल्हास्तरावरून आवश्यक औषधे व साहित्याचा पुरवठा नियमितपणे करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने व उपचार केंद्रांना पुरेसा साठा उपलब्ध आहे.

Web Title: Latest news Lumpy Disease Nashik Zilla Parishad takes measures for lumpy control, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.