Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > वाटाणा, हरभऱ्याच्या कुटारामुळे दुधात वाढ, प्रति ट्रॅक्टर कुटार खरेदी-विक्री दर काय आहे? 

वाटाणा, हरभऱ्याच्या कुटारामुळे दुधात वाढ, प्रति ट्रॅक्टर कुटार खरेदी-विक्री दर काय आहे? 

Latest news Increase in milk due to pea and gram cutar, kutar rate per tractor | वाटाणा, हरभऱ्याच्या कुटारामुळे दुधात वाढ, प्रति ट्रॅक्टर कुटार खरेदी-विक्री दर काय आहे? 

वाटाणा, हरभऱ्याच्या कुटारामुळे दुधात वाढ, प्रति ट्रॅक्टर कुटार खरेदी-विक्री दर काय आहे? 

Kutar Rate : रब्बी हंगामातील पिकांचे अवशेष (कुटार) हे जनावरांसाठी नैसर्गिक आणि पौष्टिक खाद्य मानले जाते.

Kutar Rate : रब्बी हंगामातील पिकांचे अवशेष (कुटार) हे जनावरांसाठी नैसर्गिक आणि पौष्टिक खाद्य मानले जाते.

भंडारा : रब्बी हंगामातील पिकांचे अवशेष (कुटार) हे जनावरांसाठी नैसर्गिक आणि पौष्टिक खाद्य मानले जाते. हरभरा आणि वाटाणा या कडधान्यांच्या कुटारात प्रथिनांचे प्रमाण मुबलक असते.

तर गव्हाचे कुटार जनावरांना ऊर्जा देण्याचे काम करते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे कोरडे खाद्य जनावरांच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असून त्यांच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होतो. 

वाटाणा आणि हरभऱ्याच्या कुटारामुळे दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होते. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात जेव्हा हिरवा चारा कमी पडतो, तेव्हा हे साठवून ठेवलेले कुटार जनावरांची भूक भागविण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरते. रब्बी हंगाम संपल्यानंतर लगेचच या कुटाराची विक्री सुरू होते.

कुटार खरेदी-विक्री दर (प्रति ट्रॅक्टर रुपये)

  • हरभरा (चना) कुटार : १५ हजार रुपये
  • वाटाणा कुटार : १२ हजार रुपये
  • गहू कुटार : ८ ते ९ हजार रुपये

 

वाढत्या दरामुळे पशुपालकांच्या खिशावर भार पडत असला तरी, दुधातील फॅट आणि जनावरांच्या आरोग्यासाठी हे खाद्य अपरिहार्य असल्याने खरेदीचा जोर कायम आहे. यंदा बाजारपेठेत गहू, हरभरा आणि वाटाणा कुटाराचे भाव वधारले असून, पशुपालक वर्षभराची सोय म्हणून मोठ्या प्रमाणात साठवणूक करत आहेत.

 

हेही वाचा : Harbhara Market : लोकल हरभऱ्याला क्विंटलला काय भाव मिळतोय, आवक किती होतेय, वाचा सविस्तर

 

Web Title: Latest news Increase in milk due to pea and gram cutar, kutar rate per tractor