lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > बैलाविषयी अनोखं प्रेम! २२ वर्षांची साथ एका क्षणांत तुटली, 'लखन'चा निधनाने गाव हळहळलं! 

बैलाविषयी अनोखं प्रेम! २२ वर्षांची साथ एका क्षणांत तुटली, 'लखन'चा निधनाने गाव हळहळलं! 

Latest news heartfelt farewell to Bull who has been with you for 22 years in chandrapur | बैलाविषयी अनोखं प्रेम! २२ वर्षांची साथ एका क्षणांत तुटली, 'लखन'चा निधनाने गाव हळहळलं! 

बैलाविषयी अनोखं प्रेम! २२ वर्षांची साथ एका क्षणांत तुटली, 'लखन'चा निधनाने गाव हळहळलं! 

चंद्रपूर जिल्ह्यातील येरगडे कुटुंबाने २२ वर्षांपासून शेतीत राबणाऱ्या लाडक्या 'लखन' बैलाचा उत्तम सांभाळ केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील येरगडे कुटुंबाने २२ वर्षांपासून शेतीत राबणाऱ्या लाडक्या 'लखन' बैलाचा उत्तम सांभाळ केला.

शेअर :

Join us
Join usNext

चंद्रपूर : शेतकऱ्याला आपल्या घरातील सर्जा राजा नेहमीच आपुलकीचा विषय असतो. त्यामुळे अनेकदा याच सर्जा राजाच्या निधनानंतर शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. चंद्रपूर जिल्ह्यातील येरगडे कुटुंबाने २२ वर्षांपासून शेतीत राबणाऱ्या लाडक्या 'लखन' बैलाचा उत्तम सांभाळ करण्यात आला. त्याच्या कष्टामुळे सुखाचे दिवस आले. मात्र, वृद्धापकाळाने त्याचा मृत्यू झाल्यानंतर कष्टाविषयीची कृतज्ञता शेतकऱ्याने विधिवत पूजा करत निरोप दिला.  

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा मोकासा येथील ही घटना आहे. येथील येरगुडे कुटूंबाने शेतीत राबणाऱ्या आपल्या बैलाचा सांभाळ केला. कुटूंबाचा सदस्यच असल्यासारखा लखनही दिवसभर शेतीतली कामे करत मजेत राहू लागला. मात्र वार्धक्यामुळे २२ वर्षीय लखनचा अंत झाला. येरगुडे कुटूंबासोबतचे लखनचे असलेले नाते अवघ्या क्षणात संपुष्टात आले. कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र येरगुडे परिवाराने लखनचे अंत्यसंस्कार करत तेरावीही पार पाडली. या अनोख्या घटनेची सर्वदुर चर्चा असून लखनच्या मृत्युच्या बातमीने नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.

भद्रावती तालुक्यातील तिरवंजा मोकासा येथील भोजराज येरगुडे या शेतकरी कुटुंबाने काही वर्ष अगोदर एक वासरू खरेदी केले होते. या वासरावर जिवापाड प्रेम करत कुटुंबातील सदस्या प्रमाणेच लहानाचे मोठे केले. त्याला प्रेमाने लखन हे नावही दिले. २२ वर्षे वय असलेल्या लखनचे १५ फेब्रुवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. या घटनेमुळे येरगुडे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र या दु:खातून सावरत कुटूंबियांनी लाडक्या लखन वर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. 

शेतकऱ्याचे अनोखं प्रेम 

आयुष्यभर काबाडकष्ट करून मातीतून सोनं पिकविणाऱ्या लाडक्या लखनच्या देहाची मृत्यूनंतर विटंबना होऊ नये याची काळजी घेत कुटूंबियांनी भजन मंडळी व बँडच्या साथीने लखन राजा अमर रहे या घोषणेत लखनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या लखनच्या स्मृती प्रित्यर्थ तेरावीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.  प्रत्येक बळीराजाचा ऊर अभिमानाने दाटून यावा अशी ही घटना आहे. मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेत येरगुडे कुटुंबीयांनी लाडक्या लखनकरिता दाखविलेले प्रेम, माणुसकी ही इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

बैलामुळे कुटुंब सुखी

'लखन' बैल माझ्यासाठी लेकरू होते. त्याच्या कष्टामुळे कुटुंब सुखी झाले. वृद्धापकाळामुळे तो आम्हाला सोडून गेला. मात्र, त्याची आठवण आम्ही विसरू शकत नाही. त्याच्या कष्टाचा सन्मान व्हावा म्हणून नातेवाईक व गावकऱ्यांना बोलावून तेरवीचा कार्यक्रम केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर प्रत्येक बळीराजाचा ऊर अभिमानाने भरून यावा, अशी ही घटना आहे. मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेत तिरवंजा मोकासा येथील भोजराज येरगुडे यांनी लाडक्या लखनसाठी दाखविलेले प्रेम व माणुसकी प्रेरणादायी ठरणार आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…
 

Web Title: Latest news heartfelt farewell to Bull who has been with you for 22 years in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.