Goat Farming : भारतामध्ये शेळ्यांच्या (Goat Farming) एकूण 37 जाती असून शेळीपालन हे प्रामुख्याने मांस व दूध उत्पादनासाठी केले जाते. दूध मांस उत्पादनावरून शेळ्यांचे दूध उत्पादनासाठी उपयुक्त शेळ्या व मांस उत्पादनासाठी उपयुक्त शेळ्यांचे (Goat Farming Management) वर्गीकरण करण्यात येते. यातही मांस उत्पादनासाठी कुठल्या उपयुक्त शेळ्यांच्या जाती आहेत, ते आपण या लेखातून पाहूयात...
मांस उत्पादनासाठी उपयुक्त शेळ्यांच्या जाती
१) जमनापारी : रंग प्रामुख्याने पांढरा, दुध उत्पादन २०० ग्राम/वित, मूळस्थान : उत्तर प्रदेशामधील इतवाह जिल्हा तसेच मधूरा व आग्रा.
२) बिटल : आकाराने लहान, रंगाने तांबडसर असून त्यावर ठिपके असतात. रोज २ ते ४ लिटर दुध, स्निग्धांशांचे प्रमाण ३.५ ते ४ टक्के मूळस्थान : राजस्थान, पंजाब, हरियाना
३) सिरोही : आकाराने मोठ्या, रंग गडद तपकिरी, मोठी व चांगली कास, दररोज २ लिटर दुध देतात. मूळस्थान : राजस्थानमधील सिरोही तसेच गुजरातमधील पालमपूर
४) संगमनेरी : रंग प्रामुख्याने पांढरा किंवा काळा,
मूळस्थान : या शेळ्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तसेच त्यालगतच्या तालुक्यामध्ये आढळतात.
५) ब्लॅक बेंगाल : आकाराने लहान, शक्यतो काळा रंग,
आढळस्थान : पश्चिम बंगाल, असाम व मनीपूर
६) उस्मानाबादी शेळ्या : रंग प्रामुख्याने काळा
आढळस्थान : या शेळीचे मुळस्थान उस्मानाबाद तसेच लातूर, बीड व सोलापूर.
७) बारबेरी : रंग प्रामुख्याने पांढरा व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके,
मुळस्थान : उत्तर प्रदेशामधील इतवाह, तसेच राजस्थान मधील अलिगड जिल्हा.
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक
महाराष्ट्र शेळी व विकास महामंडळ, नाशिक