Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat farming : जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर 

Goat farming : जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर 

Latest News Goat farming What to do if you want to breed goats at once Read in detail | Goat farming : जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर 

Goat farming : जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर काय करावे? वाचा सविस्तर 

Goat farming : शिवाय शेळ्यांना जर गाभ घालायचे असल्यास नियोजन कसे करावे, हे समजून घेऊयात.... 

Goat farming : शिवाय शेळ्यांना जर गाभ घालायचे असल्यास नियोजन कसे करावे, हे समजून घेऊयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Goat farming :  शेळ्यांमधील व्यवस्थापन (SheliPalan) म्हणजे त्यांची काळजी घेणे, त्यांना योग्य आहार देणे, त्यांची निगा राखणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. सध्या पाऊस सुरु असून या दिवसांत विशेष काळजी घ्यावी लागते. शिवाय शेळ्यांना जर गाभ घालायचे असल्याचे नियोजन कसे करावे, हे समजून घेऊयात.... 

जुलैमधील शेळ्यांतील व्यवस्थापन

  • शरीरावरील परजीवींच्या वाढीकडे लक्ष द्यावे.
  • नवीन करडांचे जंतनिर्मूलन करावे.
  • सर्व शेळ्यांचे आंत्रविषार, पी.पी.आर., धनुर्वातसाठी लसीकरण करून घ्यावे.
  • पैदासक्षम शेळ्यांना खुराक वाढवा.
  • पैदाशीच्या बोकडांची पैदाशीसाठी तयारी करावी. 
  • जर एकावेळी शेळ्यांना गाभ घालायचे असेल तर माज ओळखण्यासाठी 'माज ओळखणारा बोकड' (Teaser Buck) गोठ्यात ठेवावा.

जुलैमधील मेंढयांतील व्यवस्थापन

  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कळपातील मेंढ्यांची लाल लघवीचा आजार व कावीळ या रोगाची तपासणी करून उपचार करावे.
  • मेंढ्यांना शिफारशीनुसार जंताचे औषध उपचार करावेत.
  • गाभण मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी.
  • ९ ते १२ महिने वयाच्या कोकरांचे शारीरिक वजन घ्यावे.
  • सर्व मेंढ्यांना धनुर्वात रोगाचे लसीकरण करून घ्यावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Goat farming What to do if you want to breed goats at once Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.