Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Neem For Goats : शेळ्यांसाठी कडुनिंबाचा पाला अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या सविस्तर 

Neem For Goats : शेळ्यांसाठी कडुनिंबाचा पाला अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Goat Farming Neem leaves are effective for goats farming against many diseases, know in detail | Neem For Goats : शेळ्यांसाठी कडुनिंबाचा पाला अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या सविस्तर 

Neem For Goats : शेळ्यांसाठी कडुनिंबाचा पाला अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या सविस्तर 

Neem For Goats : शेळ्यांचा स्वभावच असा आहे की, त्यांना फांद्यांवरून पाने तोडून खाणे आवडते. त्यातही कडुलिंबाची पाने (Kadunimb) मोठ्या आवडीने खातात.

Neem For Goats : शेळ्यांचा स्वभावच असा आहे की, त्यांना फांद्यांवरून पाने तोडून खाणे आवडते. त्यातही कडुलिंबाची पाने (Kadunimb) मोठ्या आवडीने खातात.

शेअर :

Join us
Join usNext

Neem For Goats :  शेळीपालनात (Goat Farming) आहार व्यवस्थापन करणे अनेकदा जिकिरीचे होते. कारण बहुतांश वेळा शेळ्या कळपाद्वारे चारण्यासाठी जात असतात. या ठिकाणी उपलब्ध झाडपाल्याचा खाण्यासाठी उपयोग करतात. शेळ्यांचा स्वभावच असा आहे की त्यांना फांद्यांवरून पाने तोडून खाणे आवडते. त्यातही कडुलिंबाची पाने (Kadunimb) मोठ्या आवडीने खातात.

खरंतर, शेळ्या बाराही महिने हिरवा चारा (Goat Fodder) मोठ्या आवडीने खातात. पण हिवाळ्यात शेळ्यांना कडुलिंबाची पाने खूप आवडतात. कडुलिंब माणसासह जनावरांसाठी देखील फायदेशीर सांगितले जाते. कडुलिंब खाल्ल्याने शेळ्यांच्या पोटात जंत होत नाहीत. अनेक आजारांपासून शेळ्यांना दूर ठेवण्यास कडुनिंब मदत करत असते. 

हिवाळ्यात शेळ्यांना कडुलिंब फायदेशीर
शेळ्या जमिनीवर पडलेला चारा खाण्यापेक्षा फांद्या तोडून चारा खाणे पसंत करतात. जर शेतात हिरवा चारा नसेल तर आपण त्यांना कडुनिंबसह काही इतर झाडांची पाने खायला देऊ शकतो. एक विशेष गोष्ट म्हणजे झाडांची पाने शेळ्यांसाठी केवळ चारा म्हणून काम करत नाहीत तर औषध म्हणूनही काम करतात. उदाहरणार्थ, कडुलिंब खाल्ल्याने पोटातील जंत रोखता येतात. जर झाडांच्या चाऱ्यात पाणी कमी असेल तर अतिसाराचा धोका जवळजवळ नगण्य असतो.

शेळीला जंतनाशक म्हणून... 

पेरू, कडुलिंब आणि मोरिंगा पानांमध्ये टॅनिन आणि प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणून, तिन्ही झाडांची आणि वनस्पतींची पाने शेळ्यांना खायला घालण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने त्यांच्या पोटात जंत राहणार नाहीत. पोटात जंत असल्याने शेळ्या आणि मेंढ्यांची वाढ थांबते. पशुपालक शेळ्या आणि मेंढ्यांना जे काही खाऊ घालतो, ते त्यांच्या शरीराला लागत नाही. 

Web Title: Latest News Goat Farming Neem leaves are effective for goats farming against many diseases, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.