Goat Farming : देशात गेल्या काही वर्षात शेळीपालनात मोठी वाढ झाली आहे. केवळ दुधासाठीच नव्हे तर मांसासाठीही शेळ्यांची मागणी वाढत आहे. शिवाय आखाती देशांमध्ये, जिवंत शेळ्या देखील पुरवल्या जात आहेत. म्हणूनच देशात शेळीपालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आठ राज्ये आहेत, जिथे शेळीपालन वेगाने वाढत आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम) मधील आकडेवारीवरून नुसार देशातील शेळीपालन वाढते आहे. या योजनेअंतर्गत पशुपालनासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते. एनएलएम ही केंद्र सरकारची योजना आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक कर्ज अर्ज शेळीपालनासाठी आहेत. शेळीपालनासाठी अर्जांची संख्याही दक्षिण भारतातील राज्यांमधून लक्षणीय आहे.
या ८ राज्यांमध्ये पशुधनासहित शेळीपालन वेगाने वाढत आहे.
कर्नाटक -
एकूण अर्जांची संख्या - १०४०
शेळीपालनासाठी - ९५६
मध्य प्रदेश -
एकूण अर्जांची संख्या - ४१५
शेळीपालनासाठी - ३४१
तेलंगणा -
एकूण अर्जांची संख्या - ४५७
शेळीपालनासाठी - ४०९
महाराष्ट्र -
एकूण अर्जांची संख्या - ३१५
शेळीपालनासाठी - २४०
आंध्र प्रदेश-
एकूण अर्जांची संख्या- २४३
शेळीपालनासाठी- २१५
राजस्थान-
एकूण अर्जांची संख्या- १२५
शेळीपालनासाठी- ११९
तामिळनाडू-
एकूण अर्जांची संख्या- १४२
शेळीपालनासाठी- १३१
उत्तर प्रदेश-
एकूण अर्जांची संख्या- १४५
शेळीपालनासाठी- ११६
केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, एनएलएम अंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातून अर्ज येतात. विशेषतः, पशुपालन आणि चारा क्षेत्रातील विशिष्ट कामांसाठी अर्ज प्राप्त होतात. प्रत्येक राज्यातून प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची संख्या विचारात घेतली तर, सर्वाधिक अर्ज शेळीपालनाशी संबंधित आहेत.