Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेळीला झालेली जखम भरून काढण्यासाठी 'हा' परफेक्ट उपाय करा, वाचा सविस्तर 

शेळीला झालेली जखम भरून काढण्यासाठी 'हा' परफेक्ट उपाय करा, वाचा सविस्तर 

Latest News Goat farming Follow this perfect remedy to heal goat's wound, read in detail | शेळीला झालेली जखम भरून काढण्यासाठी 'हा' परफेक्ट उपाय करा, वाचा सविस्तर 

शेळीला झालेली जखम भरून काढण्यासाठी 'हा' परफेक्ट उपाय करा, वाचा सविस्तर 

Goat Farming : अनेकदा पावसाळ्यात शेळ्यांना जखमा होतात, त्या भरून काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी...

Goat Farming : अनेकदा पावसाळ्यात शेळ्यांना जखमा होतात, त्या भरून काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी...

शेअर :

Join us
Join usNext

Goat Farming :  शेळ्यांना पावसाळ्याअगोदर व पावसाळ्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, घटसर्प व पीपीआर या रोगांच्या प्रतिबंधक लसी देऊन घेणे आवश्यक आहे. याच बरोबर आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते समजून घेऊयात..... 

शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

 

  • मे व सप्टेंबर महिन्यात शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशकाची योग्य मात्रा देऊन जंत निर्मूलन करून घ्यावे. 
  • ढगाळ व दमट हवामान जंतांच्या वाढीसाठी पोषक असते.
  • शेळ्यांना लस कधीही रोग आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट रोगाच्या साथीमध्ये रोग झालेल्या शेळीला लस दिल्यास तो रोग बरा न होता बळावतो.
  • पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्या बसून त्या चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • माश्यांचा आवश्यक तो बंदोबस्त करावा. 
  • यासाठी कडुनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून शेडचे निर्जंतुकीकरण करावे.
  • पावसाळ्यात शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात. 
  • यासाठी अशा शेळ्यांना वाळलेल्या जागेत ठेवून त्या जखमी पोटॅशियम परमँगनेटने धुऊन त्यावर मलमपट्टी करावी.
  • पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा. 
  • तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरल्यास शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होईल.
  • पावसाळ्यात नवीन शेळ्या शक्यतो विकत घेऊ नये. घेतल्यास कमीत कमी २१ दिवस त्या शेळ्यांना काहीही रोग नाही, यांची खात्री केल्याशिवाय त्यांना मुख्य कळपात मिसळू नये.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Goat farming Follow this perfect remedy to heal goat's wound, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.