Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming Disease : शेळ्यांच्या नाकातोंडातुन पाणी गळतंय, 'हे' आहे कारण? जाणून घ्या उपाय 

Goat Farming Disease : शेळ्यांच्या नाकातोंडातुन पाणी गळतंय, 'हे' आहे कारण? जाणून घ्या उपाय 

Latest News Goat Farming Disease sheli bulkandi aajar Water is leaking from nose and mouth of goats Know the solution | Goat Farming Disease : शेळ्यांच्या नाकातोंडातुन पाणी गळतंय, 'हे' आहे कारण? जाणून घ्या उपाय 

Goat Farming Disease : शेळ्यांच्या नाकातोंडातुन पाणी गळतंय, 'हे' आहे कारण? जाणून घ्या उपाय 

Goat Farming Disease : शेळ्यांना एकाच वेळी बुळकांडी (Sheli Bulkandi) आणि सर्दीची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब उपचार करावेत. 

Goat Farming Disease : शेळ्यांना एकाच वेळी बुळकांडी (Sheli Bulkandi) आणि सर्दीची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब उपचार करावेत. 

Goat Farming Disease : शेळ्यांमधील बुळकांडी (Goat Farming Disease) हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग गाय, म्हैस, मेंढी, डुकर यांसारख्या प्राण्यांमध्येही होतो. या रोगाची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत. बुळकांडी रोगाची लक्षणे पीपीआर रोगाच्या लक्षणांसारखी असतात. त्यामुळे शेळ्यांना एकाच वेळी बुळकांडी (Sheli Bulkandi) आणि सर्दीची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब उपचार करावेत. 

शेळया-मेंढयांमधील बुळकांडी (पी.पी.आर) :

  • हा रोग मॉर्बोलाय व्हायरस नावाच्या विषाणुपासून होतो. 
  • हा रोग अतिशय संसर्गजन्य तसेच यामध्ये जनावरांना खुप ताप येतो, तसेच नाकातोंडातुन पाणी गळते. 
  • डोळयात चिपडे येऊन ती डोळयांभोवती चिकटुन बसतात, शेळयांना हगवण लागते. 
  • तोंडामध्ये व ओठावर व्रण आढळतात. श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो. 
  • या रोगाच्या उपचारासाठी तज्ज्ञ पशुवैदयकाच्या सल्ल्याने ३ ते ७ दिवस प्रतिजैवकाचा वापर करावा. 
  • पोटॅशिअम परमॅग्रेच्या सहाय्याने शेळयांचे तोंड धुवावे. तोंडातील व जीभेवरील व्रणांवर बोराग्लिसरीन लावावे. 
  • या रोगाच्या प्रतिबंधासाठी पावसाळयापुर्वी जून महिन्यात लसीकरण करून घ्यावे.

मावा :

  • हा विषाणुजन्य रोग पावसाळयातील दमट किंवा ओलसर हवामानात जास्त तिव्रतेणे आढळतो. 
  • या रोगामध्ये बाधित जनावरांच्या ओठावर, तोंडावर, कासेवर, पायावर व डोळयांच्या भोवताली प्रथम तांबुस सुज येऊन फोड येतात. 
  • त्यानंतर फोडांवर खपल्या धरतात, खपल्या सुकल्यानंतर गळून पडतात. 
  • या खपल्यांमध्ये रोगाचे जंतु असल्याने इतर जनावरांनाही झपाटयाने लागण होते. 
  • पशुवैदयकाच्या सल्ल्याने वा रोगाच्या निंत्रणासाठी उपचार करून घ्यावे.

 

- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

Web Title: Latest News Goat Farming Disease sheli bulkandi aajar Water is leaking from nose and mouth of goats Know the solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.