Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Donkey Milk : गाढवीचं दूध विकलं जातंय चमच्याने; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Donkey Milk : गाढवीचं दूध विकलं जातंय चमच्याने; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

latest news Donkey Milk: Donkey milk is being sold by the spoonful; you will be surprised to hear the price | Donkey Milk : गाढवीचं दूध विकलं जातंय चमच्याने; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Donkey Milk : गाढवीचं दूध विकलं जातंय चमच्याने; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Donkey Milk : गाढवीचं दूध नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटतंय? पण जेव्हा तुम्हाला कळेल की, एका लिटर दुधाला तब्बल ८ हजार रुपये किंमत मिळते आहे, तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल. वाचा सविस्तर (Donkey Milk)

Donkey Milk : गाढवीचं दूध नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटतंय? पण जेव्हा तुम्हाला कळेल की, एका लिटर दुधाला तब्बल ८ हजार रुपये किंमत मिळते आहे, तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल. वाचा सविस्तर (Donkey Milk)

शेअर :

Join us
Join usNext

राहुल सोनोने

गाढवीचं दूध नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटतंय? पण जेव्हा तुम्हाला कळेल की, एका लिटर दुधाला तब्बल ८ हजार रुपये किंमत मिळते आहे, तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल. (Donkey Milk)

वाडेगाव या गावात दररोज सकाळी 'गाढवीचं दूध घ्या' अशी हाक ऐकताच लोक रांगेत उभे राहतात. चमचाभर दूध ५० रुपयांना विकलं जातं आणि काही क्षणात सगळं दूध संपून जातं. ही केवळ बातमी नाही, तर आरोग्याच्या नव्या परंपरेचा उठाव आहे. (Donkey Milk)

 गाढवीच्या दुधाला तब्बल ८ हजार रुपये प्रति लिटर दर मिळत असल्याचे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मात्र, ही सोशल मीडियावरील अफवा नसून वाहेगाव परिसरातील प्रत्यक्ष वास्तव आहे. (Donkey Milk)

सकाळच्या सुमारास "गाढवीचे दूध घ्या.. दूध!" असा आवाज गावात घुमतो आणि हा आवाज ऐकताच नागरिकांची झुंबड उडते, दररोज एक व्यक्ती दोन गाढवींसह हातात लहान भांडं घेऊन परिसरात फिरत असतो. (Donkey Milk)

विशेष बाब म्हणजे हे दूध ती व्यक्त्ती चमच्याने विकते. अवघ्या काही वेळातच हे दूध संपून जाते. या विक्रेत्याशी संवाद साधला असता त्याने सांगितले, "गाढवीचे दूध हे गाय, म्हैस किंवा बकरीच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक मानले जाते. (Donkey Milk)

विशेषताः लहान मुलांसाठी ते फायदेशीर ठरते. नियमितपणे दिल्यास न्यूमोनिया, खोकला यांसारख्या त्रासांवर आराम मिळतो. मोठ्यांमध्ये दमा आणि अस्थमासारख्या श्वसनविकारांवरही याचे औषधी गुणधर्म उपयुक्त ठरतात, असा त्याचा दावा आहे.(Donkey Milk)

चमचाभर दूध ५० रुपये, लीटरचा भाव थेट ८ हजार !

गाढवीचे दूध एका चमच्यासाठी ५० रुपयांना विकले जात असून, यावरून लिटरचा भाव सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे हा प्रकार सध्या वाडेगाव परिसरात कौतुकाचा व कुतूहलाचा विषय ठरतो आहे. लाऊडस्पिकरद्वारा घोषणांच्या सहाय्याने दूध विकणारा हा विक्रेता आता लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

इतर पशुपालकही झाले चकित !

या प्रकाराने इतर दूध उत्पादक व पशुपालकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 'केवळ दोन गाढवी ठेवून एवढ्या दरात दूध विक्री शक्य आहे?' असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

काही जुन्या ग्रामस्थांच्या मते, गाढवीचे दूध खरोखरच औषधी गुणधर्माने भरलेले असून, पूर्वी काही ठिकाणी हे आजारांवर दिले जात असे, अशी आठवणही सांगितली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर :  Farmer Success Story : ७० गुंठ्यांची शेती, पण उत्पन्न एकरी २.५ लाखाचे उत्पन्न; जाणून घ्या कसे?

Web Title: latest news Donkey Milk: Donkey milk is being sold by the spoonful; you will be surprised to hear the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.