Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dairy Farming Success Story : दुधातून उभी केली अर्थव्यवस्था; 'दह्याचं गाव' बनलं भेंडेवाडी, वाचा यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:12 IST

Dairy Farming Success Story : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील भेंडेवाडी हे गाव दुग्धव्यवसायाच्या जोरावर 'दह्याचं गाव' म्हणून ओळख मिळवत आहे. दररोज सुमारे १० हजार लिटर दही उत्पादन करून येथील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे. वाढती मागणी, थेट विक्रीची पद्धत आणि महिलांचा सहभाग यामुळे भेंडेवाडीची ही यशोगाथा सध्या चर्चेत आहे.(Dairy Farming Success Story)

संतोष मगर

छोटं गाव… मर्यादित साधनं… पण मोठी स्वप्नं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील भेंडेवाडी या अवघ्या बाराशे लोकसंख्या असलेल्या गावाने आज आपल्या कष्ट, जिद्द आणि एकजुटीच्या बळावर संपूर्ण जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.(Dairy Farming Success Story)

'दह्याचं गाव' म्हणून ओळख मिळवलेल्या या गावाने दुग्धव्यवसायातून आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून दिला आहे.(Dairy Farming Success Story)

दररोज १० हजार लिटर दही; गावाची आर्थिक कणा

गावात शेतीसोबतदुग्धव्यवसाय हा केवळ पूरक नसून जीवनाचा आधार बनला आहे. सुमारे १०० हून अधिक कुटुंबे या व्यवसायात गुंतलेली आहेत. 

दररोज तब्बल १० हजार लिटर दही आणि २५ किलो तूप तयार होऊन बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे गंगाखेड आणि परभणी शहरांमध्ये या उत्पादनांना मोठी मागणी आहे.

महिलांची मेहनत; यशामागचा खरा पाया

या यशामागे गावातील महिलांचे अथक परिश्रम आहेत. दिवसभर त्या दूध प्रक्रिया करून दही आणि तूप तयार करण्यात गुंतलेल्या असतात. घरकामासोबत व्यवसाय सांभाळत त्यांनी गावाची अर्थव्यवस्था उभी केली आहे.

पहाटेची धडपड; थेट ग्राहकांपर्यंत पोहोच

भेंडेवाडीची खासियत म्हणजे विक्रीची अनोखी पद्धत.

पहाटेच गावकरी रेल्वेने परभणीकडे रवाना होतात

स्टेशनवर ठेवलेल्या सायकलींवरून शहरभर फिरतात

थेट ग्राहकांना दही विक्री करतात

या पद्धतीमुळे मध्यस्थ टाळले जातात आणि रोख उत्पन्न थेट हातात मिळते हीच त्यांच्या स्वावलंबनाची खरी ताकद आहे.

तीन पिढ्यांची परंपरा; आजही तितकीच मजबूत

दुग्धव्यवसायाची ही परंपरा गावात तीन पिढ्यांपासून चालत आली आहे. आजही नव्या पिढीने तीच परंपरा पुढे नेत आधुनिक पद्धतींसोबत जुळवून घेतली आहे.

अडचणीही कायम; कर्जाचा प्रश्न गंभीर

यशाच्या या प्रवासात काही अडथळेही आहेत.

बँकांकडून सहज कर्ज मिळत नाही

पशुपालनाला शेतीचा दर्जा असला तरी आर्थिक मदत अपुरी

विस्तारासाठी आवश्यक भांडवलाची कमतरता

गावातील वामन शेप, शाम शेप, गोविंद भेंडेकर, राजेभाऊ होळंबे, प्रमोद शेप, भुजंग भेंडेकर यांसारख्या पशुपालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

स्वावलंबनाचा आदर्श; छोटं गाव, मोठं स्वप्न

अल्पभूधारक कुटुंबांसाठी हा व्यवसाय जीवनाचा आधार ठरला आहे. कमी साधनांतही एकत्रित प्रयत्नांमुळे गावाने आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.

शासनाकडून अपेक्षा

पशुपालकांना सुलभ कर्ज सुविधा

प्रक्रिया यंत्रणा व थंड साखळी सुविधा

बाजारपेठ विस्तारासाठी मदत

भेंडेवाडीची ही कथा केवळ दही उत्पादनाची नाही, तर मेहनत, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेची आहे. योग्य पाठबळ मिळाल्यास हे छोटेसे गाव मोठ्या उद्योगात रूपांतर होऊ शकते.

भेंडेवाडी आज एकच संदेश देत आहे. 'गाव छोटं असलं तरी स्वप्न मोठं असू शकतं!'

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : आंतरपीकाचा जादूई फॉर्म्युला; हळद-मिरचीने बदलली जयराम यांची शेतीची दिशा

अधिक वाचा : Farmer Suicide Compensation Scheme : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतकरी कुटुंबांसाठी 'फास्ट ट्रॅक' मदत

English
हिंदी सारांश
Web Title : Bhendewadi's dairy farming transforms village economy: A success story.

Web Summary : Bhendewadi, known as 'Dahi village', thrives on dairy farming. Producing 10,000 liters of curd daily, it's the village's economic backbone. Women's hard work and direct sales fuel their independence, despite loan access challenges. The village seeks government support for expansion.
टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायशेतकरीशेती