Join us

Lumpy Disease : गोठ्यात करा या 14 गोष्टी, कधीही होणार नाही जीवघेणा लम्पी आजार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 20:25 IST

Lumpy Disease : पावसाळ्यात किंवा जनावरांच्या गोठ्यात (Janavarancha Gotha) खूप घाण असते तेव्हा हा आजार लवकर परिणाम दाखवतो.

Lumpy Disease :  आज देशात असे कोणतेही राज्य नाही, जिथे लम्पीचा (Lumpy Disease) प्रादुर्भाव नाही. लम्पी पसरण्याचा निश्चित वेळ नसला तरी पावसाळ्यात किंवा जनावरांच्या गोठ्यात (Janavarancha Gotha) खूप घाण असते तेव्हा हा आजार लवकर आपला परिणाम दाखवतो.

लम्पी हा गायींना होणारा एक प्राणघातक आजार आहे. लसीकरणाव्यतिरिक्त, (Vaccination) गोठ्यात काही आवश्यक खबरदारी घेतल्यास, गायींनालम्पीचा संसर्ग होण्यापासून वाचवता येईल. 

लम्पी रोगाचा विषाणू डास आणि माशांच्या मदतीने इतर गायींमध्ये वेगाने पसरतो. परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास लम्पी आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. यात जनावरांच्या गोठ्यासाठी जैव सुरक्षा ही एक प्रमुख गरज मानली जात आहे. 

या गोष्टी लक्षात ठेवा 

  1. लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे.
  2. आजारी जनावरांना निरोगी जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नये.
  3. कुंपणात डास आणि माश्या येऊ नयेत, म्हणून पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधे वापरा.
  4. आजारी भागातून इतर भागात जनावरांची हालचाल थांबवावी.
  5. रोगाचा प्रसार झाल्यास, जनावरांना पशु कळपात नेऊ नये.
  6. जनावरांच्या व्यवस्थापनात वापरलेली वाहने आणि उपकरणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.
  7. संक्रमित जनावरांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता ठेवावी.
  8. जनावरांच्या गोठ्यात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी असावी.
  9. गोठ्यात शेण, मूत्र, घाण इत्यादी साचू देऊ नये.
  10. बाधित जनावरांना संतुलित आहार द्या.
  11. संतुलित आहारामुळे जनावरांशी रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
  12. लम्पीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकांशी बोलून विल्हेवाट लावावी.
  13. मृत जनावरांचा चारा देखील जाळून नष्ट करावा.
  14. तसेच सातत्याने जवळच्या पशुवैद्यकांच्या संपर्कात राहावे. 
टॅग्स :लम्पी त्वचारोगदुग्धव्यवसायगायपाऊस