- कृष्णा अष्टेकर नाशिक : जिल्ह्यात पिकांचे उत्पादन जरी वाढले असले, तरी निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी कांदा, गहू, ऊस, हरभरा या हंगामी पिकांना प्राधान्य दिल्याने मका पिकात प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जनावरांच्या हिरवा चाऱ्याच्या मुरघासचे उत्पादन घटले आहे. चाऱ्याची किंमत प्रति टन साडेपाच ते सहा हजार रुपये इतकी झाली आहे.
मका धान्याला प्रति क्विंटल १७०० ते १८०० रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडला आहे. दुधाचा दर बघता दुभती जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना महाग पडत आहे. निफाड तालुक्यात सर्वच पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र मागील दोन-तीन वर्षापासून कांद्याच्या बाजारभावात सतत होत असलेला चढ-उतार, मुबलक पाण्यामुळे वाढते उसाचे क्षेत्र आणि निफाडची बंद पडलेली उसाची कारखानदारी व साखर उत्पादक कारखाने उसाचा दर कमी देत आहेत.
परिणामी, ऊस तोडणीला विलंब झाल्यामुळे निफाडचा शेतकरी हा मका उत्पादनाकडे वळला होता. मक्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र जास्त प्रमाणात होणाऱ्या उत्पादनामुळे भावात घसरण झाली.
अधिक दराने खरेदीसतत दर कोसळत राहिल्याने बाजार समितीत मका प्रति टन हजार ते १५०० रुपये होता. अशातच शेतकऱ्यांनी मका पिकाला फाटा दिल्याने हिरव्या मकाचा मुरघास करून अधिक काळ टिकणारा चारा निफाड तालुक्यात कमी पडल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी इतर तालुक्यातून सहा हजार रुपये प्रति टन भावाने चारा खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
माझ्याकडे दहा ते बारा दुभती जनावरे आहेत. महिन्याकाठी त्यांना नऊ ते दहा टन मक्याचा ओला चारा लागतो. चारा नसल्याने राहता तालुक्यातून चारा आणावा लागला. चारा आणण्यापर्यंत वाहतुकीसह दहा टनला ७० हजार खर्च लागला. हाच चारा काही महिन्यांपूर्वी २५०० रुपये टनने पोहोच मिळाला होता.- भाऊसाहेब बाहीकार, शेतकरी, दिंडोरी तास, निफाड
Web Summary : Niphad farmers face high fodder costs due to reduced maize cultivation, favoring onion, wheat, and sugarcane. Fodder prices reach ₹6,000/ton, impacting dairy farming profitability. Farmers are forced to buy fodder from other regions at high prices.
Web Summary : निफाड के किसानों को मक्का की खेती कम होने से चारे की ऊंची लागत का सामना करना पड़ रहा है, किसान प्याज, गेहूं और गन्ने को प्राथमिकता दे रहे हैं। चारे की कीमतें ₹6,000/टन तक पहुंच गईं, जिससे डेयरी फार्मिंग की लाभप्रदता प्रभावित हुई। किसान अन्य क्षेत्रों से ऊंचे दामों पर चारा खरीदने को मजबूर हैं।